IPLची ट्रॉफी मुंबईकडे; पण ऑरेन्ज, पर्पल कॅपचा मान हैदराबादला!

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 22, 2017 04:15 PM IST

IPLची ट्रॉफी मुंबईकडे; पण ऑरेन्ज, पर्पल कॅपचा मान हैदराबादला!

22 मे : आयपीएलच्या दहाव्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सने विजेतेपद आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्सने उपविजेतेपदावर नाव कोरलं आहे. पण आयपीएलमध्ये मानाची समजली जाणारी 'ऑरेन्ज कॅप' आणि 'पर्पल कॅप'चा मान मात्र हैदराबादच्या शिलेदारांनी मिळाला आहे.

हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने यंदाच्या मोसमात 14 सामन्यांत 58.27 च्या सरासरीने 641 धावांचा रतीब घातला आणि सर्वोत्तम फलंदाजासाठीची ऑरेन्ज कॅप मिळवली. यामध्ये एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. ऑरेन्ज कॅपचा मान मिळवण्याची वॉर्नरची ही दुसरी वेळ आहे.

तर हैदराबादचाच वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने यंदाच्या सिझनमध्ये सर्वाधिक 26 विकेट्स घेतल्या. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी भुवनेश्वरलाच पर्पल कॅपचा मान मिळाला. यासाठी त्याला 10 लाख रुपयांचं बक्षीसही मिळालं.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 22, 2017 04:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...