मुंबई इंडियन्सच्या जेतेपदाचं जोस बटलरने 'सावरिया' स्टाईलमध्ये केलं सेलिब्रेशन!

मुंबई इंडियन्सच्या जेतेपदाचं जोस बटलरने 'सावरिया' स्टाईलमध्ये केलं सेलिब्रेशन!

  • Share this:

22  मे : आयपीएलच्या अंतिम सामन्यात रायझिंग पुणे सुपरजायंट्सवर अवघ्या एका धावेने विजय मिळवत मुंबई इंडियन्सने तिसऱ्यांदा आयपीएल विजेतेपद पटकावलं. याचा आनंद मुंबईकरांनी ढोल-ताशे वाजवत, फटाके फोडत साजरा केला. पण सगळ्यात हिट ठरलं ते क्रिकेटपटू जोस बटलर याचं सेलिब्रेशन.

यंदाच्या आयपीएलमध्ये जोस बटलर हा मुंबईच्या संघातून खेळत होता. मात्र, यावर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याची इंग्लंडच्या टीममध्ये निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्याला आयपीएल अर्धवट सोडून मायदेशी परतावं लागलं. साहजिकच, मुंबई-पुण्यातील शेवटच्या सामन्यात त्याला खेळता आलं नाही. पण असं असलं तरी त्याचं मन भारतातच होतं. आपला संघ कशी कामगिरी करतो, यावर तो लक्ष ठेवून होता.

मुंबई आणि पुण्यामध्ये काल झालेला सामना बटलर एका हॉटेल रुममध्ये बसून पाहत होता. यावेळी तो अंगावर फक्त टॉवेल गुंडाळून बसला होता. शेवटची ओव्हर सुरू होती, पुण्याला 1 चेंडूत 4 धावा हव्या होत्या. तेव्हा क्रिस्टियननं जोरदार फटका मारला. पण लाँग ऑनवर असलेल्या खेळाडूनं चेंडू अडवत थेट पार्थिवकडे फेकला. यावेळी बटलर जोरजोरात ओरडत 'सावरिया' स्टाईलमध्ये उभा राहिला... आणि जेव्हा पार्थिवनं आपली भूमिका चोखपणे बजावत वॉश्गिंटनला रनआऊट केलं तेव्हा  बटलरचा आनंद गगनात मावेनासा झाला, आणि आनंदाच्या भरात तो टॉवेल सोडूनच नाचू लागला. इतकंच नव्हे तर अनोख्या सेलिब्रेशनचा हा व्हिडिओ त्यानं इन्स्टाग्रामवरही अपलोड केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल झाला आहे.

First published: May 22, 2017, 2:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading