दिल्ली, 05 एप्रिल : आयपीएलच्या 12 व्या हंगामात सनरायजर्स हैदराबादने दिल्लीवर 5 विकेटने विजय मिळवला. दिल्लीला 129 धावांमध्ये रोखण्यात हैदराबादचा फिरकीपटू मोहम्मद नबीने महत्त्वाची भूमिका पार पाडली. विजयानंतर म्हणाला की, माझं काम विकेट घेण्याचं नाही तर फलंदाजांना धावा करण्यापासून रोखणं हे आहे.
नबीने दिल्लीविरुद्ध टाकलेल्या 4 षटकांत 21 धावा दिल्या. यात त्याने दिल्लीच्या दोन फलंदाजांना बाद केलं. यामुळेच दिल्लीच्या संघाला 8 बाद 129 धावांपर्यंत मजल मारता आली. नबी म्हणाला की, फलंदाजाच्या धावगतीला रोखण्याचा प्रयत्न करत असतो. यामुळे फलंदाज दबावाखाली यावा आणि इतर गोलंदाजांना विकेट घेता येते.
माझी रणनिती असते की, राशीद खान आणि मुजीब हे विकेट घेणारे गोलंदाज आहेत तर मी फलंदाजांना जखडून ठेवण्याचा प्रयत्न करावा. राष्ट्रीय संघातही मला 10 षटकानंतर गोलंदाजी करायला मिळते. त्यामुळे जास्ती जास्त निर्धाव चेंडू टाकण्याचा माझा प्रयत्न असतो. यामुळे फलंदाजावर दबाव येतो आणि दुसऱ्या बाजूने राशिद खान विकेट घेण्यात यशस्वी होतो असं मोहम्मद नबीने सांगितले.
आयपीएलमध्ये यंदाच्या हंगामात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये नबी तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 2 सामन्यात 6 गडी बाद केले आहेत. पहिल्या क्रमांकावर युझवेंद्र चहल आहे. त्याने 8 बळी घेतले आहेत. तर दुसऱ्या स्थानी इम्रान ताहीर, कसिगो रबाडा आणि ड्वेन ब्राव्हो हे आहेत. त्यांनी प्रत्येकी 7 विकेट घेतल्या आहेत.
VIDEO : 5 वर्षांत निधी कुठे आला? प्रीतम मुंडेंच्या प्रचाराला गेलेल्या भाजपच्या आमदारावर गावकरी भडकले