'विराट' टीमचा आणखी एक फ्लाॅप शो, पंजाबचा 'राॅयल' विजय

'विराट' टीमचा आणखी एक फ्लाॅप शो, पंजाबचा 'राॅयल' विजय

पंजाब विरुद्ध सामन्यात 139 धावांचा पाठलाग करणारी विराट सैना 119 रन्सवर ढेर झाली

  • Share this:

05 मे : विराट कोहलीची टीम आयपीएलमध्ये सपेशल फ्लाॅप ठरलीये. पंजाब विरुद्ध सामन्यात 139 धावांचा पाठलाग करणारी विराट सैना 119 रन्सवर ढेर झाली. बेंगळुरूकडे एकापेक्षा एक खेळाडू असतानाही पराभवाला सामोरं जावं लागलं.

टाॅस जिंकून बेंगलुरने गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि पंजाबला 138 धावांवर रोखलं. पण, विराट कोहली, एबी डिविलियर्स, ख्रिस गेल, शेन वॅाटसन आणि केदार जाधव या सारखे खेळाडू असून सुद्धा नाव मोठे लक्षण खोटे असा प्रकार ठरलाय.

138 रन्सचा पाठलाग करताना बेंगळूर चॅलेंजर्सची दमछाक झाली. अवघ्या 37 रन्सवर 3 गडी बाद झाले होते. ख्रिस गेल भोपळाही न फोडला माघारी परतला. तर कॅप्टन विराट कोहली 6 रन्सवर आऊट झाला. बेंगळुरला सांभाळण्याची संधी मिळण्याआधीच एबी डिव्हिलियर्स 10 रन्सवर आऊट झाला. संदीप शर्माने विराट कोहली,एबी डिविलियर्स आणि ख्रिस गेलला आऊट करून बेंगळुर टीमला सुरुंग लावला. संपूर्ण 20 ओव्हरर्स खेळून 119 रन्सवर बेंगळुर टीम गारद झाली. . त्यामुळे विराटची सैन्या आता प्लेआॅफच्या बाहेर फेकली गेली आहे.

First published: May 6, 2017, 12:06 AM IST

ताज्या बातम्या