मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

International Women’s Day 2021: अनुष्का-वामिकाचा गोड फोटो शेअर करुन विराटनं लिहिला इमोशनल मेसेज

International Women’s Day 2021: अनुष्का-वामिकाचा गोड फोटो शेअर करुन विराटनं लिहिला इमोशनल मेसेज

 टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) त्याच्या आयुष्यातील दोन खास स्त्रियांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देताना एक इमोशनल मेसेज लिहिला आहे.

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) त्याच्या आयुष्यातील दोन खास स्त्रियांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देताना एक इमोशनल मेसेज लिहिला आहे.

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) त्याच्या आयुष्यातील दोन खास स्त्रियांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देताना एक इमोशनल मेसेज लिहिला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 8 मार्च : जगभरात दरवर्षी 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं महिलांना खास शुभेच्छा दिल्या जातात. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) त्याच्या आयुष्यातील दोन खास स्त्रियांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देताना एक इमोशनल मेसेज लिहिला आहे.

विराटनं त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि मुलगी वामिका (Wamika) या दोघींचा एक गोड फोटो त्याच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरुन शेअर केला आहे. विराटनं लिहलं आहे की, ‘एखाद्या बाळाला जन्म देताना पाहणे हा अविश्वसनीय आणि जबरदस्त अनुभव आहे. तो अनुभवल्यानंतर तुम्हाला महिलेच्या खऱ्या शक्तीची जाणीव होते. त्यांची थोरवी समजते. परमेश्वरानं मातृत्वाचं वरदान स्त्रियांनाच दिलं आहे. पुरुषांना नाही याचं कारण म्हणजे स्त्रिया या पुरुषांपेक्षा अधिक शक्तीशाली असतात.

माझ्या आयुष्यातील सर्वात मजबूत आणि सर्वात कोमल हृदयाच्या महिलेला महिला दिनाच्या शुभेच्छा. त्याचबरोबर जी आपल्या आईसारखी होणार आहे तिला देखील शुभेच्छा. जगातील सर्व अद्भुत महिलांना महिला दिवसाच्या शुभेच्छा.’ अशी पोस्ट विराटनं लिहली असून ती आता चांगलीच व्हायरल (Viral) झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा 11 जानेवारी रोजी आई-बाबा झाले. त्यानंतर त्यांनी 1 फेब्रुवारी रोजी त्यांच्या मुलीच्या नावाची घोषणा केली होती. इन्स्टाग्रामवर भावुक पोस्ट लिहित अनुष्कानं मुलीचं नाव ‘वामिका’ ठेवल्याचं जाहीर केलं.

‘मला रोज महिला दिन साजरा करायचाय’; अमृता फडणवीस यांचा नवा VIDEO व्हायरल )

वामिकाचा अर्थ दुर्गा देवी आहे. दुर्गा देवीचा उल्लेख वामिका नावाने होतो. 'आम्ही प्रेम, जिव्हाळ्याने आमचं आयुष्य जगत आलो आहोत. पण या छोट्या वामिकाने आमच्या जगण्याला वेगळ्याच उंचीवर नेलं आहे. अश्रू, हसणं, भावना या सगळ्या गोष्टी आम्ही काही क्षणांमध्येच अनुभवतो. आम्हाला झोप मिळत नाही, पण आमचं मन प्रेमाने पूर्णपणे भरलं आहे. तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि आशिर्वादाबाबत धन्यवाद,' अशी पोस्ट अनुष्का शर्माने केली होती.

First published:

Tags: Bollywood, Cricket, International women's day, Social media viral, Virat kohli and anushka sharma