आंतरराष्ट्रीय खेळाडू सीमा अँटिलने पतीशी तोडलं नातं, सोशल मीडियावर लिहलं घटस्फोटीत

सीमा अंटिलचा पती अंकुश पुनियाबरोबरचा वाद दोन वर्षांपूर्वी सर्वप्रथम समोर आला होता. पण, नंतर ती याबाबत काहीही बोलतन नव्हती. 2018 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धा जिंकल्यानंतर सीमा बर्‍याचदा हरियाणामध्ये तिच्या माहेरीच रहायची.

सीमा अंटिलचा पती अंकुश पुनियाबरोबरचा वाद दोन वर्षांपूर्वी सर्वप्रथम समोर आला होता. पण, नंतर ती याबाबत काहीही बोलतन नव्हती. 2018 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धा जिंकल्यानंतर सीमा बर्‍याचदा हरियाणामध्ये तिच्या माहेरीच रहायची.

  • Share this:
    नवी दिल्ली, 15 जून : आंतरराष्ट्रीय खेळाडू सीमा अँटिलने (Seema Antil Divorce) तिचा पती अंकुश पुनियाशी वैवाहिक संबंध तोडले आहेत. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून सीमाने तिचे पुनिया आडनाव काढून टाकलं आहे. यासह तिनं स्वत:च नाव घटस्फोटीत असं लिहिलं आहे. बऱ्याच दिवसांपासून सीमाचा तिच्या मेरठ येथील रहिवासी पती अंकुश पुनियाशी (ankush puni) वाद सुरू होता. पण, यावर सीमा उघडपणे काहीही बोलत नव्हती. अंकुशनं मात्र याबाबत आपलं मौन सोडलं. अलिकडं सीमा बर्‍याच दिवसांपासून रशियामध्ये सराव करत होती. अंकुश हाच सीमाचा नेहमी प्रशिक्षक असायचा. 10 वर्षात झाले वेगळे 6 फेब्रुवारी 2011 रोजी सीमा आणि अंकुश यांचे लग्न झाले होते. अंकुश मेरटमधील सकोटी तांडा गावचा रहिवासी आहे. दोघांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचं वचन घेतलं होतं. मात्र, दहा वर्षांमध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. अंकुशने एक सहायक, पती आणि प्रशिक्षक बनवून सीमाला नेहमी करिअरमध्ये पुढे नेण्याचा प्रयत्न केला. अंकुश पुनियाने पत्नी सीमा एशियन गेम्स 2018 मध्ये जिंकावी यासाठी हरिद्वारहून पायी कावड यात्रा केली होती. सीमानं देखील आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून थोडे मागे जात तिचा पत्नी धर्म निभावला होता. सीमा प्रत्येक खेळावेळी अंकुशसोबत असायची. त्याच्या प्रशिक्षणावरतीच खेळ करत होती. रिओ ऑलिम्पिकवेळी अंकुशला सीमा सोबत जाण्याची परवानगी मिळाली नव्हती. त्यावेळी सीमा विना प्रशिक्षक खेळामध्ये सामील झाली होती. प्रत्येक वेळी सीमाचा फिटनेस, खेळ यापाठीमागे अंकुश काम करायचा. सीमा अंटिलचा पती अंकुश पुनियाबरोबरचा वाद दोन वर्षांपूर्वी सर्वप्रथम समोर आला होता. पण, नंतर ती याबाबत काहीही बोलतन नव्हती. 2018 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धा जिंकल्यानंतर सीमा बर्‍याचदा हरियाणामध्ये तिच्या माहेरीच रहायची, तिथेच सराव करायची. पण, जेव्हा सीमा मेरठला येत असे तेव्हा दोघांमध्ये वाद व्हायचा. सध्या सीमा रशियामध्ये आहे, अंकुश मेरठमध्ये स्पोर्ट्स अकॅडमी चालवत आहे. अंकुशने 2004 च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. हे वाचा - ATM ट्रान्झेक्शनआधी कॅन्सल बटण दोन वेळा दाबल्यामुळे पिन चोरी होत नाही? वाचा काय आहे सत्य या दोघांचा खटला घटस्फोटासाठी कोर्टात पोहोचला आहे. सीमानं आपल्या पतीपासून कायमचे वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात तिनं तिच्या फेसबुक अकाउंटवरून पतीचे आडनाव पुनिया काढून टाकले असून तिनं स्वत:ला घटस्फोटीत असं म्हटलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published: