Intercontinental Football Cup : क्रिकेट...क्रिकेट करणाऱ्यांनो छेत्रीचा फूटबॉलमधला भीमपराक्रम वाचलात का?

इंटरकॉन्टिनेंटल कपमध्ये ताजिकिस्तान विरोधात भारताला 2-4नं पराभव स्विकारावा लागला.

News18 Lokmat | Updated On: Jul 8, 2019 12:45 PM IST

Intercontinental Football Cup : क्रिकेट...क्रिकेट करणाऱ्यांनो छेत्रीचा फूटबॉलमधला भीमपराक्रम वाचलात का?

अहमदाबाद, 08 जुलै : एकीकडे ICC Cricket World Cupमध्ये कोणता संघ बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंगळवारी पहिला सेमीफायनल सामना भारत-न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. तर दुसरीकडे भारतात सुरु असलेल्या इंटरकॉन्टिनेंटल कपमध्ये भारतीय फुटबॉल संघ चांगल्या कामगिरीसाठी सज्ज आहे. दरम्यान रविवारी ताजिकिस्तान विरोधात झालेल्या सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला. मात्र, कर्णधार सुनील क्षेत्री यानं या सामन्यात अनोखा विक्रम केला आहे.

रविवारी अहमदाबाद येथे ताजिकिस्तान विरोधात झालेल्या सामन्यात दोन महत्त्वपूर्ण गोल करत सर्वात जास्त गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान या सामन्यात भारताला 2-4नं पराभव स्विकारावा लागला. भारताचा दुसरा सामना 13 जुलै रोजी दक्षिण कोरिया विरोधात होणार आहे.

भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्री यांच्या नावावर 70 आंतरराष्ट्रील गोल आहेत. ताजिकिस्तान विरोधात झालेल्या सामन्यात क्षेत्रीनं पहिला गोल चौथ्या मिनिटाला केला. तर, दुसरा गोल 41व्या मिनिटाला केला. दरम्यान पहिला गोल करताच क्षेत्रीनं अर्जेंटिनाचा कर्णधार लियोनल मेस्सी याला मागे टाकले. मेसीनं 136 आंतरराष्ट्रीय सामन्यात 68 गोल केले आहेत. तर, क्षेत्रीनं केवळ 109 सामन्यात 70 गोल केले आहेत. रोनाल्डोच्या नावावर 158 सामन्यात 88 गोल आहेत.

Loading...

दरम्यान भारताला ताजिकिस्ताननं तब्बल तिसऱ्यांदा पराभूत केले. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 5 सामने झाले आहेत. यातील केवळ एकाच सामन्यात भारताला विजय मिळवता आला आहे. तर, एक सामना रद्द झाला आहे.

वाचा- WORLD CUP : ...तर सेमीफायनल न खेळताच भारत थेट फायनलमध्ये धडक देणार

वाचा- World Cup: टीम इंडियाकडे शेवटची संधी; 44 वर्षांपूर्वीच्या पराभवाचा बदला घेणार!

वाचा- World Cup मध्ये ICC परंपरा मोडून लॉर्डसवर रचणार इतिहास?

VIDEO : 'माझ्या मुलाला वाचवा', नारायण राणेंनी माझ्याकडे विनंती केली; पण...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 8, 2019 12:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...