टी-20 वर्ल्ड कपआधी धोक्याची घंटा! हुकुमी खेळाडूंची दुखापत टीम इंडियासाठी डोकेदुखी

टी-20 वर्ल्ड कपआधी धोक्याची घंटा! हुकुमी खेळाडूंची दुखापत टीम इंडियासाठी डोकेदुखी

भारतीय संघ या वर्षभरात सतत क्रिकेट खेळत आहे. त्याचा परिणाम संघावर आणि खेळाडूंवर होत आहे.

  • Share this:

पुणे, 09 ऑक्टोबर : भारतीय संघ या वर्षभरात सतत क्रिकेट खेळत आहे. त्याचा परिणाम संघावर आणि खेळाडूंवर होत आहे. यातच पुढच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपआधीच टीम इंडियाचे महत्त्वाचे खेळाडू दुखापत ग्रस्त असतील तर ही भारतीय संघासाठी धोक्याची घंटा आहे. वर्ल्ड कपनंतर भारतानं वेस्ट इंडिज दौरा केला. आता दक्षिण आफ्रिका, त्यानंतर बांगलादेश, श्रीलंका हे संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. परिणामी या सगळ्य़ाचा खेळाडूंच्या आरोग्यावर ताण पडत आहे. त्याचा प्रत्यय काही दिवसांपूर्वी आला, जेव्हा भारताच्य़ा दोन प्रमुख खेळाडूंना दुखापतीमुळं दोन-तीन महिने क्रिकेट खेळता येणार नाही आहे.

सध्याच्या भारतीय संघावर नजर टाकल्यास टी-20, एकदिवसीय आणि कसोटी मालिकांसाठी भारताकडे वेगळा संघ नाही. त्यामुळं महत्त्वाच्या खेळाडूंवर जास्त ताण पडतो. त्यामुळेच हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांसारखे हुकुमी खेळाडू सध्या दुखापतग्रस्त आहेत. महत्त्वाचे म्हणजे हे दोन्ही खेळाडू बऱ्याच कालावधीपासून दुखापतग्रस्त आहेत, मात्र क्रिकेट खेळण्याच्या नादात त्याचे दुर्लक्ष झाले. त्यामुळं संघ व्यवस्थापनेनं खेळाडूंच्या करिअरशी न खेळता त्यांना विश्रांतीसाठी वेळ देण्याचीही गरज आहे.

वाचा-IND vs SA : टीम इंडियाला पुण्यात इतिहास घडवण्याची संधी, करणार विश्वविक्रम?

हुकुमी एक्का बुमराहशिवाय भारतीय संघ कमकुवत

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीने संघातून बाहेर आहे. स्ट्रेस फ्रॅक्चर झाल्याने बुमराह पुढचे दोन महिने खेळू शकणार नाही. त्याला दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्धच्या मालिकेला मुकावे लागले. त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच त्याला दुखापतीमुळे इतका काळ संघातून बाहेर रहावं लागणार आहे. दरम्यान बुमराह उपचारासाठी इंग्लंडला रवाना होणार आहे. त्यामुळं आता बुमराह बांगलादेशविरोधात होणाऱ्या मालिकेत खेळणार नाही आहे. बुमराहने गेल्या दोन वर्षांत संघाच्या गोलंदाजीची धुरा पेलली आहे. त्यानं 12 कसोटीत 62 गडी बाद केले आहेत. त्याशिवाय 58 एकदिवसीय सामन्यात 103 तर 42 टी20 मध्ये 51 गडी बाद केले आहेत. त्यामुळं बुमराहशिवाय भारतीय गोलंदाजी कमकुवत असली तरी, बुमराहला योग्य पर्याय शोधणे गरजेचे आहे.

वाचा-सर्जरीनंतर पांड्या व्हिलचेअरवर... चालताना होतोय त्रास, शेअर केला VIDEO

हार्दिक पांड्या वर्षभर दुखापतग्रस्त

एकीकडे बुमराह तर दुसरीकडे भारताचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्या दोन ते तीन महिने क्रिकेट खेळणार नाही आहे. गेल्या वर्षी दुबईमध्ये झालेल्या आशियाई कप दरम्यान पांड्याला दुखापत झाली होती. मात्र त्यानंतरही पांड्यानं आयपीएल, वर्ल्ड कप आणि दक्षिण आफ्रिका दौरा खेळला होता. इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपनंतर पांड्याला विश्रांती दिली होती. मात्र पांड्याची दुखापत गंभीर असून, त्याला जास्तीत जास्त काळ विश्रांतीसाठी देण्याची खरी गरज आहे. खरतर पांड्यानं आयपीएल 2020मध्येही खेळू नये. मात्र आयपीएलमध्ये पांड्या मैदानात दिसू शकतो.

वाचा-IND vs SA : पुण्यातील कसोटी सामन्यावर संकट; दोन्ही संघांना बसू शकतो मोठा फटका!

आईच्या कुशीतून 8 महिन्यांच्या बाळाला पळवलं, धक्कादायक CCTV VIDEO

Published by: Priyanka Gawde
First published: October 9, 2019, 2:05 PM IST
Tags: team india

ताज्या बातम्या