Shikhar Dhawan : 'ऋषभ पंतसह चार क्रिकेटर लपून बसले BCCIच्या मुख्यालयाबाहेर', मीम्स व्हायरल

Shikhar Dhawan : 'ऋषभ पंतसह चार क्रिकेटर लपून बसले BCCIच्या मुख्यालयाबाहेर', मीम्स व्हायरल

ICC World Cup 2019 शिखर धवन तीन आठवड्यांसाठी दुखापतीमुळं वर्ल्ड कप बाहेर गेला आहे.

  • Share this:

लंडन, 11 जून : ICC Cricket World Cupमध्ये भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारताचा धडाकेबाज सलामीवीर शिखर धवन तीन आठवड्यांसाठी संघाबाहेर गेला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शिखर धवनच्या उजव्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळं न्युझीलंडविरुद्धच्या सामन्यात धवनला खेळता येणार नाही आहे. असे असले तरी, भारतीय संघाकडे राखीव सलामी फलंदाज केएल राहुल असल्यामुळं तो रोहित शर्मासोबत सलामीला उतरु शकतो. मात्र 15 संभाव्य खेळाडूंच्या संघात शिखर धवन ऐवजी जर, कोणत्या एका खेळाडूला संधी मिळणार असेल तर तो कोण असावा यावरुन सोशल मीडियावर सध्या व्हायलर होत आहे. यात ऋषभ पंत, अंबाती रायडू, सुरेश रैना, श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ या चार खेळाडूंना नेटेकरांनी पसंती दाखवली आहे.

ऑस्ट्रेलियाविरोधात सामन्यात शतकी खेळी केल्यानंतर अंगठ्याला दुखापत झाल्यामुळं क्षेत्ररक्षण करताना शिखर मैदानावर दिसला नाही. दरम्यान त्याची दुखापत स्कॅन करण्यात आली असून, त्याच्या अंगठ्याला सूज आल्याचे यात निष्पण्ण झाले आहे. धवनच्या दुखापतीवर चर्चा करुन फिजीओ पैट्रीक फरहार्ट यांनी तीन आठवड्यांसाठी धवन खेळणार नसल्याचे सांगितले आहे.

जर, केएल राहुलला सलामीसाठी आला तर तिसऱ्या क्रमांकावर कोणता फलंदाज उतरणार यावरुन सध्या चर्चा जोरात रंगल्या आहेत.


वाचा-भारताला मोठा धक्का, शिखर धवन वर्ल्ड कपमधून बाहेर

वाचा- 'भारताचा पराभव निश्चित', न्यूझीलंडच्या दिग्गज खेळाडूनं सांगितला मास्टरप्लॅन

वाचा- रोहित, विराट नाही तर ‘हा’ खेळाडू ठरणार 'गेमचेंजर' !


पूर्वमोसमी पावसामुळे मुंबईत विमानसेवा विस्कळीत, महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 11, 2019 02:32 PM IST

ताज्या बातम्या