IndvsNZ : न्यूझीलंडने केवळ 15 षटकात मिळवला भारतावर विजय

IndvsNZ : न्यूझीलंडने केवळ 15 षटकात मिळवला भारतावर विजय

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला.

  • Share this:

हॅमिल्टन, 31 जानेवारी : भारताविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडने 8 गडी राखून विजय मिळवला. ट्रेन्ट बोल्टच्या भेदक गोलंदाजीपुढे फलंदाजांची दाणादाण उडाल्यामुळे भारताचा डाव केवळ 92 धावांत संपुष्ठात आला. विजयाचे लक्ष्य न्यूझीलंडने केवळ 2 गड्यांच्या मोबदल्यात पार केले. पाच सामन्यांची मालिका भारताने याआधीच जिंकली आहे. पण या विजयामुळे न्यूझीलंडला मालिकेतील पराभवाचे अंतर कमी करता आले.

त्याआधी न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाचा अवस्था एकवेळा 8 बाद 55 अशी झाली होती. तळाच्या फलंदाजांनी धडपड केल्याने भारताला 92 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताकडून सर्वाधिक नाबाद 18 धावा युझवेंद्र चहलने केल्या. त्याने कुलदीप यादवच्या (15 धावा) साथीने भारताला 55 धावांवरून वर 92 पोहचवून निच्चांकी धावसंख्येवर बाद होण्याची नामुष्की टाळली. ट्रेन्ट बोल्ट आणि ग्रँडहोमच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय फलंदाज ढेपाळले. ट्रेन्ट बोल्टने 5 तर ग्रँडहोमने 3 बळी घेत भारतीय फलंदाजीला खिंडार पाडले.

भारताचे सलामीवीर आणि मधली फळी ढेपाळल्यानंतर मैदानात आलेल्या हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमारने काही काळ पडझड थांबवली. मात्र 19 व्या षटकात ग्रँडहोमने भुवनेश्वरला बाद करत भारताला सातवा धक्का दिला. त्यानंतर बोल्टने हार्दिक पांड्याला बाद केले. पांड्याने 16 धावा केल्या.

न्यूझीलंडच्या ट्रेन्ट बोल्टने सलामीवीर शिखर धवनला पायचित करत भारताला पहिला धक्का दिला. त्याने 13 धावा काढल्या. त्यानंतर रोहित शर्माला (7 धावा) आपल्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. त्यानंतर आलेल्या अंबाती रायडू आणि दिनेश कार्तिकला ग्रँडहोमने भोपळाही फोडू दिला नाही. त्यांच्यानंतर आलेल्या केदार जाधव आणि शुभमन गिलला बाद करत भारताचा निम्मा संघ तंबूत धाडला.

कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. तंदुरूस्त नसल्याने महेंद्रसिंग धोनी या सामन्यातही मैदानात उतरला नाही. विराटच्या अनुपस्थितीत रोहित शर्माकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा त्याचा 200 वा एकदिवसीय सामना आहे. विराट कोहलीच्या जागी 19 वर्षीय शुभमन गिलला संधी देण्यात आली आहे. या सामन्यातून शुभमन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे. भारताने पहिले तीन सामने जिंकून मालिका खिशात टाकली आहे.

SPECIAL REPORT : 'कल्याण-पुणे-नाशिक' अशी असेल लोकल सेवा

First published: January 31, 2019, 8:00 AM IST

ताज्या बातम्या