बे ओव्हल, 26 जानेवारी : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात टॉस जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पहिल्या वनडे सामन्यात विजय मिळवल्यानंतर या सामन्यासाठी भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
पाच सामन्यांच्या या वनडे मालिकेत भारत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे आजचा दुसरा सामना जिंकून ही आघाडी कायम राखण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडसमोर धावांचा डोंगर उभारण्याचे भारताचे लक्ष्य असेल.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ:
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, महेंद्र सिंह धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, विजय शंकर, शुभमन गिल, युजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, खलील अहमद, रविंद्र जडेजा.
दरम्यान, पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडवर आठ गडी राखून विजय मिळवला. या विजयामुळे पाच सामन्यांच्या या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतासाठी शिखर धवनने सर्वाधिक ७५ (१०३) धावा केल्या. शिखरला कर्णधार विराटने चांगली साथ दिली. विराटने ४७ धावा केल्या. शिखरसोबत अंबाती रायडूने धावांची भागीदारी करत अखेर भारताला विजय मिळवून दिला. मोहम्मद शमीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. टीम इंडियाला पहिला धक्का रोहित शर्माच्या स्वरुपात मिळाला. रोहितने २४ चेंडूत ११ धावा केल्या. यानंतर कोहली आणि धोनीने टीमची कमान सांभाळली. या दरम्यान धवनने त्याचे करिअरमधील २७ वे अर्धशतक पूर्ण केले. जवळपास नऊ सामन्यांनंतर धवनने अर्धशतक साजरं केलं.
VIDEO : अनुष्का, विराटला विचार टीममध्ये जागा मिळेल का? कतरीनाची तुफान बॅटिंग व्हायरल