बे ओव्हल,26 जानेवारी : न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने 4 बाद 324 धावा केल्या. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडसमोर 325 धावांचे आव्हान ठेवले आहेत.
नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार विराट कोहलीने फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 154 धावांची भागिदारी केली. शिखर धवन 66 धावा काढून बाद झाल्यानंतर रोहित शर्मा देखील लगेच बाद झाला. त्याने 96 चेंडूत 87 धावा केल्या. त्यानंतर कोहली, रायडू आणि धोनीने संघाला 300 चा टप्पा पार करून दिला.
हिटमॅन रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी भारताकडून कोणत्याही विकेटसाठी सर्वात जास्त शतकी भागिदारी करणाऱ्या जोडीत तेंडुलकर आणि सेहवाग यांना मागे टाकले आहे. रोहित-धवन यांनी 14 शतकी भागिदारी करून ते तिसऱ्या स्थानावर पोहचले आहेत.
भारताकडून सर्वात जास्त 26 शतकी भागिदारी सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी केल्या आहेत. क्रिकेट खेळणाऱ्या कोणत्याही संघाकडून शतकी भागिदारी करण्यात सचिन-सौरवचे नाव आघाडीवर आहे.