न्यूझीलंडच्या कर्णधाराचा 26 वर्ष जुना 'मास्टर स्ट्रोक', गब्बर अडकला जाळ्यात

  • Share this:

तिसऱ्या आणि निर्णायक टी20 सामन्यात न्यूझीलंडच्या कर्णधाराने 26 वर्ष जुना डावपेच वापरुन भारताच्या सलामीवीराला बाद केलं. केन विल्यम्सनने त्यांच्याच खेळाडूने 26 वर्षांपूर्वी सुरू केलेला डावपेच खेळला.

न्यूझीलंडने उभारलेल्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताला पहिल्याच षटकात धक्का बसला. सलामीची जोडी रोहित शर्मा आणि शिखर धवन यांना गोलंदाजी करण्यासाठी मिशेल सेटनरला पाचारण केलं.

फिरकीपटू असलेल्या सेटनरने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. त्याने पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर शिखर धवनला झेलबाद करत भारताला धक्का दिला.

मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये 1992 ला सर्वात आधी न्यूझीलंडचा कर्णधार मार्टिन क्रोने पहिल्या षटकात फिरकीपटूच्या हातात चेंडू सोपवला होता. वर्ल्डकपच्या सामन्यात दीपक पटेलने पहिलं षटक टाकलं होतं.

क्षेत्ररक्षणात असलेल्या निर्बंधामुळे त्यावेळी पहिल्या 15 षटकांत फिरकीपटूंनी गोलंदाजी करायला दिली जात नव्हती. मार्टिन क्रोने ही परंपरा बदलली.

न्यूझीलंडच्या कर्णधाराने वर्ल्डकपच्या सर्व सामन्यात दीपक पटेलला पहिलं षटक टाकण्याची संधी दिली होती. त्याचा परिणामही गोलंदाजासाठी चांगला होता. फिरकीपटूविरुद्ध कोणत्याच फलंदाजाला मोठे फटके खेळता आले नव्हते.

भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने देखील असा प्रयोग अनेकदा केला आहे. त्याने भारतीय संघात आणि चेन्नईकडून खेळताना आर अश्विनला पहिलं षटक टाकण्यासाठी दिलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 10, 2019 03:46 PM IST

ताज्या बातम्या