6 चेंडूत हव्या होत्या 3 धावा, भारताने गमावला सामना

6 चेंडूत हव्या होत्या 3 धावा, भारताने गमावला सामना

स्मृतीच्या झंझावाती अर्धशतकानंतरही भारताचा इंग्लंडविरुद्ध पराभव

  • Share this:

गुवाहाटी, 9 मार्च : भारत विरुद्ध इंग्लंड महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन टी20 सामन्यांची मालिका इंग्लंडने 3-0 अशी जिंकली. तिसऱ्या टी20 सामन्यात भारताचा एका धावेने पराभव झाला. इंग्लंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताला 120 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला अखेरच्या षटकात 3 धावांची गरज होती. पण भारतीय महिला संघाला फक्त एकच धाव काढता आली. या षटकात भारताने मोक्याच्या क्षणी दोन विकेट गमावल्याने पराभवाचा धक्का बसला.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर डॅनियल वॅट, बिउमाँट आणि एमी जोन्स यांनी केलेल्या खेळीने इंग्लंडला 119 धावा करून दिल्या. सलामीच्या जोडीने केलेल्या 51 धावांच्या भागिदारीनंतर इंग्लंडच्या संघाला 119 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताकडून अनुजा पाटील, हर्लीन देओल यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर एकता बिश्त आणि पूनम यादवने प्रत्येकी एक विकेट घेतली.

120 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला 20 षटकांत 118 धावा करता आल्या. कर्णधार स्मृती मानधनाच्या झंझावाती अर्धशतकी आणि मिताली राजच्या 30 धावानंतरही भारतीय संघ ढेपाळला. जेमिमाह रॉड्रिग्जचा फॉर्म सध्या भारतीय संघाची डोकेदुखी बनला आहे. या तिन खेळाडूंशिवाय इतर एकाही खेळाडूला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.

First published: March 9, 2019, 2:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading