मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IndvsAusT20: पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर, म्हणाला....

IndvsAusT20: पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर, म्हणाला....

IndvsAusT20: पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर, म्हणाला....

IndvsAusT20: पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर, म्हणाला....

IndvsAusT20: एका पत्रकाराने रोहित शर्माला एवढा मोठा प्रश्न विचारला, की तो ऐकून तो थोडा हैराणच झाला. त्यानंतर त्याने असं उत्तर दिलं, की सर्वांनाच हसू आलं.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 19 सप्टेंबर: भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) मैदानावरच्या धमाकेदार खेळासोबतच आपल्या बिनधास्त आणि रोखठोक स्वभावासाठीही ओळखला जातो. समोर आलेला बॉल तडीपार टोलवणं हे जसं त्याचं वैशिष्ट्य आहे, तसंच समोर आलेले प्रश्नही तो सहजपणे परतवून लावतो. तसंच, जे मनात असेल ते फारसं पुढे-मागे न पाहता व्यक्त करतो. त्यामुळे पत्रकार परिषदांमध्ये अनेकदा तो असं काही बोलून जातो, की जे ऐकल्यावर कोणालाच हसू आवरत नाही. अलीकडेच या गोष्टीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.

एका पत्रकाराने रोहित शर्माला एवढा मोठा प्रश्न विचारला, की तो ऐकून तो थोडा हैराणच झाला. त्यानंतर त्याने असं उत्तर दिलं, की सर्वांनाच हसू आलं. मोहालीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 मॅचवेळी रोहित शर्मा पत्रकार परिषद घेत होता. तेव्हा एका पत्रकाराने त्याला टी-20 वर्ल्ड कपच्या संदर्भात त्याने केलेल्या वक्तव्यासंदर्भात प्रश्न विचारला. 90-95 टक्के टीम तयार आहे, असं वक्तव्य रोहितने केलं होतं. त्या संदर्भात तो प्रश्न होता. त्या प्रश्नालाच जोडून त्या पत्रकाराने आणखी एक प्रश्न विचारला. महिला क्रिकेटपटू झूलन गोस्वामीच्या रिटायरमेंटबद्दल रोहित शर्माने आपलं मत व्यक्त करावं, असा तो प्रश्न होता. हे सगळं एकाच प्रश्नात विचारल्यामुळे तो प्रश्न खूप मोठा झाला. रोहित शर्मा शांतपणे तो प्रश्न ऐकून घेत होता आणि टोपीवर लावलेला गॉगल व्यवस्थित करत होता. पत्रकार जेव्हा प्रश्न विचारायचा थांबला, तेव्हा रोहित शर्मा त्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी म्हणाला, 'अरे यार, किती मोठा, लंबाचौडा प्रश्न विचारता?'

रोहित शर्माचे हे उद्गार ऐकून तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच हसू आवरलं नाही. त्यानंतर रोहित शर्माने त्या पत्रकाराच्या प्रश्नाचं उत्तर दिलं.

झूलन गोस्वामी ही एक लीजंड खेळाडू असल्याचं रोहित शर्माने आपल्या उत्तरात सांगितलं. तो म्हणाला, 'मी जेव्हा दुखापतग्रस्त झालो होतो, तेव्हा काही काळ एनसीएमध्ये होतो. त्या वेळी मी झूलन गोस्वामी यांच्याशी थोडी बातचीत केली होती. कारण त्याही तेव्हा एनसीएमध्येच होत्या. त्या मला बॉलिंग करत होत्या. त्यांच्या इन-स्विंगरने माझ्यापुढे आव्हान निर्माण केलं होतं.'

हेही वाचा: T20 WC : वर्ल्ड कप जिंकण्यासाठी प्लॅन ठरला! रोहितनं खेळाडूंना दिला महत्त्वाचा सल्ला

झूलन गोस्वामी इंग्लंडविरुद्ध वन-डे सीरिजमध्ये खेळत असून, ही तिच्या करिअरमधली शेवटची सीरिज आहे. त्यानंतर ती निवृत्ती घेणार आहे. त्या अनुषंगाने पत्रकाराने रोहित शर्माला हा प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नावर उत्तर देताना रोहित शर्माने झूलन गोस्वामीचा गौरव केला.

'त्यांना केव्हाही खेळताना पाहिलं, तरी त्यांच्यामध्ये असलेली खेळाप्रतिची पॅशन दिसून येते, जाणवते. त्यांचं वय किती आहे हे मला माहिती नाही; पण त्या आताही प्रचंड कष्ट घेतात आणि प्रतिस्पर्धी संघाला पराजित करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. यातूनच आपल्याला काय ते समजतं, बोध घेता येतो. मी त्यांना केवळ शुभेच्छा देऊ शकतो. असा खेळाडू पिढीत एखादाच असतो,' असे गौरवोद्गार रोहित शर्माने काढले.

First published:

Tags: Cricket, Rohit sharma