INDvsAUS : विजयानंतर विराट झाला भावुक, 2011 च्या वर्ल्डकप विजयाची आठवण काढत म्हणाला...

INDvsAUS : विजयानंतर विराट झाला भावुक, 2011 च्या वर्ल्डकप विजयाची आठवण काढत म्हणाला...

गेल्या 70 वर्षांतील भारताचा हा ऑस्ट्रेलियातील पहिलाच कसोटी मालिका विजय आहे. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली भावूक झालेला पाहिला मिळाला.

  • Share this:

सिडनी, 7 जानेवारी : ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानात मात देत भारताने मालिका विजय साकारला. गेल्या 70 वर्षांतील भारताचा हा ऑस्ट्रेलियातील पहिलाच कसोटी मालिका विजय आहे. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली भावूक झालेला पाहिला मिळाला.

"भारताने जेव्हा 2011 साली विश्वचषक जिंकला तेव्हा मी संघातील सर्वात युवा खेळाडू होतो. त्या विजयावेळी संघातील अनुभवी खेळाडू खूपच भावनिक झाले होते. मी युवा असल्याने त्यांच्याएवढा भावूक झालो नाही. पण आता खऱ्या अर्थाने कळतंय की विजय काय असतो," अशी प्रतिक्रिया विजयानंतर विराट कोहलीने दिली आहे.

दरम्यान, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यातील पाचवा दिवसही पावसामुळे वाया गेल्यामुळे अखेर चौथा आणि अंतिम सामना अनिर्णित घोषीत करण्यात आला. यामुळे भारताने चार सामन्यांच्या या मालिकेत 2-1 असा ऐतिहासिक विजय मिळवत कसोटी मालिका खिशात घातली. आतापर्यंत भारताला ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवर कसोटी मालिका जिंकता आली नव्हती. विराट कोहलीच्या टीमने ही कमतरताही भरुन काढली. सुमारे 70 वर्षांनंतर भारताने ही कामगिरी करुन दाखवली आहे. विराट कोहली ऑस्ट्रेलियामध्ये मालिका जिंकणारा पहिला भारतीय आणि आशियातला पहिला कर्णधार झाला आहे.

चार सामन्यांपैकी तीन सामन्यात शतकी खेळी खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले. 1988 नंतर ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा घरच्या मैदानावर फॉलोऑनचा सामना करत पराभव सहन करावा लागला.

चौथ्या कसोटी सामन्यात ढगाळ वातावरणामुळे तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रापासून खेळ थोड्या थोड्या वेळात थांबवण्यात येत होता. चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ फक्त 300 धावा करुन तंबूत परतला होता. त्यांच्यावर फॉलोऑनलची नामुष्की आली होती. दुसऱ्यांदा फलंदाजीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ मैदानात उतरलाही होता. मात्र पावसामुळे चौथ्या दिवसाचा खेळ फार काळ चालला नाही. पाचव्या दिवशी पावसामुळे खेळाडू मैदानात उतरलेही नाही. अखेर चौथा सामना अनिर्णित म्हणून घोषित करण्यात आला.

VIDEO : ऑस्ट्रेलियात इतिहास घडवण्याआधी विराट आणि टीम इंडियाचा हटके अंदाज

First published: January 7, 2019, 9:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading