INDvsAUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय ३१ धावांनी जिंकला सामना

INDvsAUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय ३१ धावांनी जिंकला सामना

सुरुवातीपासूनच भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने मजबूत पकड निर्माण केली होती.

  • Share this:

अॅडिलेड, 10 डिसेंबर : भारताने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवत चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे. आर, अश्निनने हेजलवूडला बाद करत भारतासाठी विजय सुकर करुन दिला. भारतासाठी जसप्रीत बुमराह, आर. अश्विन आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी ३ गडी बाद केले. तर इशांत शर्माने १ गडी बाद केला. ऑस्ट्रेलियासाठी फलंदाज शॉन मार्शने सर्वाधिक ६० धावा केल्या. मार्शशिवाय कोणत्याही फलंदाजाने ४० च्या पुढे धावा केल्या नाहीत. भारतासाठी चेतेश्वर पुजाराने महत्त्वपूर्ण कामगिरी केली. पहिल्या डावात १२३ धावा तर दुसऱ्या डावात ७१ धावा करुन भारतासाठी धावांचा डोंगर उभा करण्यास महत्त्वाची भूमिका बजावली. मॅन ऑफ दी मॅच म्हणून त्याचा गौरवही करण्यात आला.

भारताने आज ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्याने एक इतिहास रचला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात तब्बल १० वर्षांपूर्वी धूळ चारली होती. २००८ मध्ये झालेल्या पर्थ कसोटीत भारताने विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्यापासूनच मजबूत पकड निर्माण केली आहे. या विजयासोबत कोहली इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामना जिंकणारा पहिला आशियाई कर्णधार ठरला.

INDvsAUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय ३१ धावांनी जिंकला सामना

दरम्यान,भारताने दुसऱ्या डावात ३०७ धावा केल्या . पहिल्या डावातील 15 धावांच्या आघाडीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 323 धावांचं आव्हान ठेवलं आहे. चौथ्या दिवशीचा खेळ सुरू झाल्यानंतर भारताने ३ बाद १५१ धावांहून पुढे खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर ४० धावांवर नाबाद असणाऱ्या चेतेश्वर पुजाऱ्याने आपलं अर्धशतक साजरं केलं. अर्धशतक केल्यानंतर पुजारा ७१ धावांवर बाद झाला. अजिंक्य रहाणेनेही चांगली खेळी करत ७० धावा केल्या. रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला. रोहित फक्त १ धाव घेऊन बाद झाला.

भारतीय संघ- मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी.

ऑस्ट्रेलियाचा संघ- मार्कस हॅरिस, एरॉन फिंच, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हैंडसकॉम्ब, ट्रेविस हेड, टिम पेन (यष्टीरक्षक / कर्णधार), पॅट कमिंस, मिशेल स्टार्क, जोश हॅजलवूड, नाथन लियोन.

First published: December 10, 2018, 8:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading