INDvsAUS : कसोटी मालिकेतील भारताचा हिरो वनडे संघातून बाहेर

INDvsAUS : कसोटी मालिकेतील भारताचा हिरो वनडे संघातून बाहेर

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची चार सामन्यांची कसोटी मालिका 2-1 ने जिंकत इतिहास रचला. त्यानंतर आता वनडेतही कागांरूंना धूळ चारण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 जानेवारी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने दमदार कामगिरी केली. पण बुमराह आता वनडे मालिकेला मुकणार आहे. कारण त्याला विश्रांती देण्याचा निर्णय संघव्यवस्थापनाकडून घेण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी बुमराहच्या जागी युवा गोलंदाज मोहम्मद सिराज याला संधी देण्यात आली आहे. तर आणखी एक वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौल याला टी-20 संघात स्थान देण्यात आलं आहे.

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची चार सामन्यांची कसोटी मालिका 2-1 ने जिंकत इतिहास रचला. त्यानंतर आता वनडेतही कागांरूंना धूळ चारण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे.

वनडे मालिकेत कशी असेल टीम इंडिया?

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, अंबाती रायडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रविंद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, खलिल अहमद आणि मोहम्मद शमी

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यासाठी बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी भारतीय टीमची घोषणा केली आहे. महेंद्र सिंग धोनीची आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. तसंच न्यूझीलंडविरुद्ध टी-20 सामन्यातही धोनीला संधी देण्यात आली आहे.

वेस्ट इंडीज दौऱ्यात टी-20 मालिकेत धोनीला बाहेर बसवण्यात आलं होतं. त्याचबरोबर आॅस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेतही धोनीला संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे धोनीचं क्रिकेट करिअर संपलं की काय अशी चर्चा रंगली होती. परंतु, बीसीसीआयनं या चर्चांना पूर्णविराम लगावत धोनीला भारतीय टीममध्ये पुन्हा खेळण्यासाठी संधी दिली आहे.

अष्टपैलू हार्दिक पांड्यालाही संधी देण्यात आली आहे. हार्दिक पांड्याला संधी देऊन ऋषभ पंतला बाहेर बसवण्यात आलं आहे. आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेतून पंतला वगळण्यात आलं आहे. त्यामुळे पंतची 2019 च्या वर्ल्डकपमध्ये खेळण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे. एकदिवसीय सामन्यातून पंतला जरी वगळण्यात आलं असलं तरी टी-20 मालिकेसाठी संधी देण्यात आली आहे. मात्र, धोनी आणि कार्तिक असल्यामुळे पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळणार का, हे सांगणं अवघड आहे.

VIDEO : ऑस्ट्रेलियात विराटच्या टीमचा नवा विक्रम; असं केलं जोरदार सेलिब्रेशन

First published: January 8, 2019, 11:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading