सिडनी, 6 जानेवारी : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या आणि अंतिम कसोटी समान्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने कुलदीप यादवला संधी दिली. याच चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने आपल्या गोलंदाजीने कांगारूंना सळो की पळो केले. दुसऱ्या डावात कुलदीप यादवने ऑस्ट्रेलियाच्या 5 फलंदाजांना बाद केले.
ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ अवघ्या ३०० धावा करुन तंबूत परतला. अंतिम सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने त्यांच्या पहिल्या डावात ३०० धावा केल्याने भारताकडे अजूनही ३२२ धावांची आघाडी आहे. यामुळेच भारताने ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला.
Kuldeep Yadav's first Test on Aussie soil and he collects a five-wicket haul!#AUSvIND | @Domaincomau pic.twitter.com/e29NWD6oyZ
— cricket.com.au (@cricketcomau) January 6, 2019
ऑस्ट्रेलियासाठी मार्कस हॅरिसने सर्वाधिक ७९ धावा केल्या. त्याशिवाय मारनस लैबुशांगेने ३८ आणि पीटर हँड्सकॉम्बने ३७ धावा केल्या. भारतासाठी कुलदीप यादवने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. तर रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराहने एक गडी बाद केला.
VIDEO : ऑस्ट्रेलियात इतिहास घडवण्याआधी विराट आणि टीम इंडियाचा हटके अंदाज