S M L

INDvsAUS: इतिहास घडवणारे खेळाडू मालामाल, बीसीसीआयकडून मोठी घोषणा

ऐतिहासिक कामगिरीनंतर विजयी संघातील प्रत्येक खेळाडूसाठी बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे.

Updated On: Jan 8, 2019 04:45 PM IST

INDvsAUS: इतिहास घडवणारे खेळाडू मालामाल, बीसीसीआयकडून मोठी घोषणा

नवी दिल्ली, 8 जानेवारी : ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानात मात देत भारताने मालिका विजय साकारला. गेल्या 70 वर्षांतील भारताचा हा ऑस्ट्रेलियातील पहिलाच कसोटी मालिका विजय आहे. या ऐतिहासिक कामगिरीनंतर विजयी संघातील प्रत्येक खेळाडूसाठी बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये गावस्कर-बॉर्डर ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघातील प्रत्येक खेळाडूला 15 लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. बीसीसीआयने काही वेळापूर्वी याबाबतची घोषणा केली.

भारतीय संघाने काय पराक्रम गाजवला?


भारताने चार सामन्यांच्या या मालिकेत २-१ असा ऐतिहासिक विजय मिळवत कसोटी मालिका खिशात घातली. आतापर्यंत भारताला ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवर कसोटी मालिका जिंकता आली नव्हती. विराट कोहलीच्या टीमने ही कमतरताही भरुन काढली. सुमारे ७० वर्षांनंतर भारताने ही कामगिरी करुन दाखवली आहे. विराट कोहली ऑस्ट्रेलियामध्ये मालिका जिंकणारा पहिला भारतीय आणि आशियातला पहिला कर्णधार झाला आहे.



Loading...

चार सामन्यांपैकी तीन सामन्यात शतकी खेळी खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले. १९८८ नंतर ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा घरच्या मैदानावर फॉलोऑनचा सामना करत पराभव सहन करावा लागला.



चौथ्या कसोटी सामन्यात ढगाळ वातावरणामुळे तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रापासून खेळ थोड्या थोड्या वेळात थांबवण्यात येत होता. चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ फक्त ३०० धावा करुन तंबूत परतला होता. त्यांच्यावर फॉलोऑनलची नामुष्की आली होती. दुसऱ्यांदा फलंदाजीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ मैदानात उतरलाही होता. मात्र पावसामुळे चौथ्य दिवसाचा खेळ फार काळ चालला नाही. पाचव्या दिवशी पावसामुळे खेळाडू मैदानात उतरलेही नाही. अखेर चौथा सामना अनिर्णित म्हणून घोषित करण्यात आला.


VIDEO : ऑस्ट्रेलियात इतिहास घडवण्याआधी विराट आणि टीम इंडियाचा हटके अंदाज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 8, 2019 04:45 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

Vote responsibly as each vote
counts and makes a difference

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close