कुंबळेच्या 'फिरकी'चे फॅन आहात? VIDEO पाहिल्यानंतर तुमचा आदर आणखी वाढेल, कारण...

कुंबळेच्या 'फिरकी'चे फॅन आहात? VIDEO पाहिल्यानंतर तुमचा आदर आणखी वाढेल, कारण...

ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका सुरू होण्याआधी 'क्रिकेट नेक्स्ट' या वेब पोर्टवर अनिल कुंबळेची एक मुलाखत झाली होती. आगामी मालिकेत कोण जिंकू शकतं, असा प्रश्न या मुलाखतीत कुंबळेला विचारण्यात आला.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 जानेवारी : ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानात मात देत भारताने मालिका विजय साकारला. गेल्या 70 वर्षांतील भारताचा हा ऑस्ट्रेलियातील पहिलाच कसोटी मालिका विजय आहे. या ऐतिहासिक विजयानंतर माजी कर्णधार आणि प्रशिक्षक अनिल कुंबळेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. त्यामागचं कारणही तितकचं खास आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका सुरू होण्याआधी 'क्रिकेट नेक्स्ट' या वेब पोर्टवर अनिल कुंबळेची एक मुलाखत झाली होती. आगामी मालिकेत कोण जिंकू शकतं, असा प्रश्न या मुलाखतीत कुंबळेला विचारण्यात आला.

या मुलाखतीत कुंबळेनं भारत ही मालिका 2-1 ने जिंकेल असा अंदाज व्यक्त केला होता. एवढंच काय तर पावसाचं वातावरण असल्याने एखादा सामना अनिर्णितही राहु शकतो, असा अंदाजही कुंबळेनं व्यक्त केला होता.

भारताने ऑस्ट्रेलियाला 2-1 ने धूळ चारली आणि सोशल मीडियावर अनिल कुंबळेचा हा मालिकेआधीची मुलाखत व्हायरल झाला. ज्यामध्ये कुंबळेनं मालिकेबाबत नेमका अंदाज व्यक्त केला होता.

भारताला आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवर कसोटी मालिका जिंकता आली नव्हती. विराट कोहलीच्या टीमने ही कमतरताही भरुन काढली. पाचवा दिवसही पावसामुळे वाया गेल्यामुळे अखेर चौथा आणि अंतिम सामना अनिर्णित घोषीत करण्यात आला. यामुळे भारताने चार सामन्यांच्या या मालिकेत 2-1 असा ऐतिहासिक विजय मिळवत कसोटी मालिका खिशात घातली.

सुमारे 72 वर्षांनंतर भारताने ही कामगिरी करुन दाखवली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाचं असं जोरदार सेलिब्रेशन केलं.

VIDEO : ऑस्ट्रेलियात इतिहास घडवण्याआधी विराट आणि टीम इंडियाचा हटके अंदाज

First published: January 8, 2019, 4:12 PM IST

ताज्या बातम्या