S M L

पुन्हा रो'हीट', 35 चेंडूत झळकावले वेगवान शतक

इंदुरच्या मैदानात विराट कोहली आणि विरेंद्र सेहवागने कर्णधार म्हणून शतक झळकावले आहे. आता रोहितनेही दोघांशी बरोबरी केलीये.

Sachin Salve | Updated On: Dec 22, 2017 10:24 PM IST

पुन्हा रो'हीट', 35 चेंडूत झळकावले वेगवान शतक

22 डिसेंबर :  टीम इंडियाचा तडाखेबाज फलंदाज रोहित शर्माने आणखी एक हीट इनिंग पेश करत टी-20 सामन्यात खणखणीत शतक झळकावले आहे. 35 चेंडूत रोहित शर्माने शतक पूर्ण करत टी-20 सामन्यात सर्वात वेगवान शतकाच्या विक्रमाशी बरोबरी केलीये. रोहितच्या तडाखेबाज खेळीच्या बळावर  भारतानं श्रीलंकेपुढे विजयासाठी २६१ धावांचा लक्ष्य ठेवलय.

इंदुरमध्ये श्रीलंकेविरुद्ध भारताने पहिली बॅटिंग करत आहे. ओपनिंगला उतरलेल्या रोहित शर्मा आणि लोकश राहुलने दणक्यात सुरुवात केलीये. रोहित शर्माने अवघ्या 23 चेंडुंत 7 चौकार आणि 3 षटकार लगावत अर्धशतक झळकावले. अर्धशतक झाल्यानंतर रोहितने लंकनं गोलंदाजाची धुलाई केली. अवघ्या 35 चेंडूत रोहितने खणखणीत शतक झळाकवले. आता टी-20 क्रिकेटमधील वेगवान शतकाचा विक्रम रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मीलरच्या नावे झाला आहे. रोहित शर्मा 118 धावा फटकावत माघारी परतला. यात 12 चौकार आणि 10 षटकारांचा समावेश आहे.

भारतानं २० षटकात २६० धावा केल्यात. रोहित शर्मानंतर के एल राहुलने दमदार फटकेबाजी करत ८९ धावांची खेळी केली. 49 चेंडूत त्याने 5 चौकार आणि 8 षटकार लगावले आहे. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीने 21 चेंडूत 28 धावांची खेळी केली. 20 षटकात भारताने 260 धावांचा डोंगर उभा केला. भारताचा हा टी-20 सामन्यात आतापर्यंतचा सर्वोत्तम धावसंख्या आहे.मात्र तोपर्यंत त्याने टी-20मधील अनेक विक्रम नावावर कले आहे. इंदुरच्या मैदानात विराट कोहली आणि विरेंद्र सेहवागने कर्णधार म्हणून शतक झळकावले आहे. वेस्टइंडिज विरुद्ध 8 नोव्हेंबर 2011 ला एकदिवशीय सामन्यात सेहवाने दुहेरी शतक झळकावले आहे. 149 चेंडूत सेहवागने 219 धावा कुटल्या होत्या. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर द्विशतक झळकावणार सेहवाग हा दुसरा भारतीय ठरला होता.

मागील वर्षी विराट कोहलीने न्युझीलंड विरुद्ध इंदुर इथं कसोटी सामन्यात 211 धावांची विक्रमी खेळी केली होती. कर्णधार म्हणून विराटच्या नावावर द्विशतकाच्या विक्रमाची नोंद झालीये.

आता याच मैदानावर टी-20 सामन्यात रोहित शर्माने कर्णधार म्हणून शानदार शतक झळकावले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 22, 2017 08:45 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close