मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

सोशल मीडियावर रंगली धावपटूच्या समलैंगिक विवाहाची चर्चा; PHOTO पाहून नेटकरी म्हणाले...

सोशल मीडियावर रंगली धावपटूच्या समलैंगिक विवाहाची चर्चा; PHOTO पाहून नेटकरी म्हणाले...

दुती चंदन

दुती चंदन

परदेशात समलैंगिक संबंधांना आणि विवाहाला मान्यता आहे. मात्र, आपल्या देशात फक्त भिन्न लिंगी वैवाहिक संबंधांना मान्यता मिळालेली आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 3 डिसेंबर : परदेशात समलैंगिक संबंधांना आणि विवाहाला मान्यता आहे. मात्र, आपल्या देशात फक्त भिन्न लिंगी वैवाहिक संबंधांना मान्यता मिळालेली आहे. भारतामध्ये अद्याप समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता मिळेलेली नाही. सध्या हे प्रकरण कोर्टामध्ये आहे. या पार्श्वभूमीवर भारताची स्टार धावपटू द्युती चंदने सोशल मीडियावर असे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामुळे जोरदार चर्चा सुरू झाली आहे. द्युती चंद समलैंगिक आहे. काही वर्षांपूर्वीच तिनं जाहीरपणे आपण समलैंगिक असल्याचं स्वीकारलं आहे. द्युती मोनालिसा नावाच्या मुलीशी रिलेशनशीपमध्ये आहे. द्युतीनं आता सोशल मीडियावर मोनालिसासह काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमुळे तिच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. ‘आज तक’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

द्युती चंदने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये द्युतीनं सूट घातलेला दिसत आहे. तर तिची गर्लफ्रेंड मोनालिसानं लेहेंगा घातलेला दिसत आहे. दोघीही लग्नाच्या वेषात स्टेजवर वधू-वरांच्या खुर्चीवर बसलेल्या दिसत आहेत. हे फोटो बघून दोघींनी लग्न केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा -  'लोकसंख्या वाढवण्यासाठी हिंदूंनी मुलींचं लग्न 18 ते 20 वयात लावून दिलं पाहिजे' आसामच्या खासदाराचं वक्तव्य

हे फोटो शेअर केल्यानंतर युजर्सनी पोस्टवर विविध कमेंट्स केल्या आहे. द्युतीच्या चाहत्यांनी तिचं अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे. पण, दोघींनी लग्न केलं आहे की हे फक्त फोटोशूट आहे, याबाबत सस्पेन्स आहे.

द्युती चंदच्या इन्स्टाग्राम अकाउंटला भेट दिल्यास हा सस्पेन्स स्पष्ट होण्यास मदत होईल. द्युतीनं मोनालिसासोबतचे फोटो शेअर करण्यापूर्वी आणखी काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो तिच्या बहिणीच्या लग्नातील आहेत. या फोटोंमध्येही द्युती आणि मोनालिसा सूट आणि लेहेंग्यामध्येच दिसत आहेत. म्हणजेच दोघींचे फोटो द्युतीच्या बहिणीच्या लग्नसोहळ्यातील आहेत, हे स्पष्ट होत आहे.

ओडिशाची रहिवासी असलेल्या द्युतीचा जन्म जिजापूर जिल्ह्यातील चका गोपालपूर गावात झालेला आहे. तिने देशासाठी अनेक पदकं जिंकली आहेत. समलैंगिक संबंधांचा खुलासा झाल्यानंतर तिला तिच्याच गावात विरोधाचा सामना करावा लागला आहे. तिचं कुटुंबीयदेखील तिच्या निर्णयाच्या विरोधात आहेत. समलैंगिक संबंधांचा खुलासा झाल्यानंतर आणि घरच्यांच्या विरोधानंतर द्युती म्हणाली होती, "ते मला पुरुषाशी लग्न करून मुलं जन्माला घालण्यास सांगत आहेत. त्यांना फक्त हीच परंपरा माहीत आहे. पण, मी ज्या शहरात शिकले तिथे सगळे मला पाठिंबा देत आहेत. माझं कुटुंब आणि गाव मला पाठिंबा देईल की नाही हे मला माहीत नाही. हे पाहण्यासाठी मला प्रतीक्षा करावी लागेल."

First published:

Tags: India, Marriage, Sports