• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • न्यूझीलंडकडून हरल्यानंतरही Team Indiaला आहे सेमी फायनलचा चान्स, वाचा काय आहे समीकरण?

न्यूझीलंडकडून हरल्यानंतरही Team Indiaला आहे सेमी फायनलचा चान्स, वाचा काय आहे समीकरण?

virat kohli

virat kohli

न्यूझीलंड विरुद्धची (IND vs NZ )मॅच गमावली तर टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) आव्हान संपुष्टात येण्याचा धोका भारतीय क्रिकेट टीमसमोर आहे. पण...

 • Share this:
  नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात रविवारी होणाऱ्या मॅचमध्ये सर्वाधिक दबाव टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीवर (Virat Kohli) असणार आहे. पाकिस्तान विरुद्ध पराभूत झाल्यानं टीम इंडिया सध्या दबावात आहे. न्यूझीलंड विरुद्धची मॅच गमावली तर टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) आव्हान संपुष्टात येण्याचा धोका भारतीय क्रिकेट टीमसमोर आहे. न्यूझीलंडकडून पराभव स्विकारवा लागला तर टीम इंडिया सेमीफाइनलपर्यंत पोहचू शकेल का? अशी शंका क्रिकेट जगतात व्यक्त करण्यात येत आहे. तर जाणून घेऊयात सेमीफाइनलपर्यंत पोहचण्याचे समीकरण आणि प्वाइंट्स टेबलमधील ग्रुप 2 ची अवस्था. खरे सांगायचे तर, न्यूझीलंडकडून हरल्यानंतरही टीम इंडियाला सेमी फायनलचा चान्स आहे. पाकिस्तानने 3 सामन्यांत 3 विजय मिळवले असून ते सध्या 6 गुणांसह प्वाइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहेत. पाकिस्तानने सेमीफाइनलमधील आपले स्थान जवळपास पक्के केले आहे. आता त्याला स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्ध खेळायचे आहे. या दोघांविरुद्ध पाकिस्तान सहज विजय मिळवू शकतो. म्हणजेच आता सेमीफाइनलसाठी ग्रुप 2 मध्ये फक्त 1 स्थान शिल्लक आहे.

  एका जागेसाठी ३ संघ दावेदार

  स्कॉटलंड आणि नामिबिया सेमीफाइनलच्या शर्यतीतून बाहेर पडले असे गृहीत धरले तरी तिन्ही संघ बाद फेरीसाठी लढतील. हे संघ भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान आहेत. विशेष म्हणजे अफगाणिस्तानने आपल्या दोन सामन्यांतून उपांत्य फेरी गाठण्याचा दावेदार असल्याचे संकेत दिले आहेत.

  पुढील ३ सामने महत्त्वाचे

  आतापर्यंत भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांनी एकमेकांविरुद्ध सामने खेळलेले नाहीत. म्हणजेच पुढील तीन सामन्यांनंतर कोणते संघ सेमीफाइनलमध्ये पोहोचणार हे निश्चित होईल.

  टीम इंडिया न्यूझीलंडकडून हरली तर...

  न्यूझीलंडकडून पराभूत झाला तरी टीम इंडिया सेमीफाइनलमध्ये पोहचू शकते असा तर्क क्रिकेट जगतात लावण्यात येत आहे. मात्र त्यांना इतर संघांच्या विजय-पराजयावर अवलंबून राहावे लागणार आहे. भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या तिन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकल्यास आणि प्रत्येकी एक पराभव पत्करावा लागण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, जर भारत न्यूझीलंडकडून हरला आणि नंतर अफगाणिस्तानने न्यूझीलंडला हरवले तर तिन्ही गुण समान होतील. अशा परिस्थितीत सेमीफाइनलचा निर्णय नेटरनेटवर अवलंबून असणार आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published: