India vs Pakistan Highlight : पाकिस्तानच्या खेळाडूंनी केली भारतीय बाॅलर्सची धुलाई

आज आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानी फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतलाय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 18, 2017 07:31 PM IST

India vs Pakistan Highlight : पाकिस्तानच्या खेळाडूंनी केली भारतीय बाॅलर्सची धुलाई

18 जून : आज आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानी फलंदाजांनी  भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतलाय. आज टॉस जिंकून विराटने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला .पण हा निर्णय चांगलाच महागात पडल्याचं दिसतंय.

भारतीय गोलंदाजांनी सुरुवात चांगली केली. बुमराहनं फखरला एका बॉलवर क्लीन बॉल्डही केलं ,पण तो नो बॉल असल्यानं त्याला जीवदान मिळालं.  पण त्यानंतर  पाकिस्तानच्या  सलामीच्या जोडीला तोडणेच भारताला फार कठीण गेलं. पाकिस्तानची पहिली विकेटच  128 वर पडली.अझर अली आणि फखरमधे झालेल्या कन्फ्यूजनमुळं अझर अली रन आउट झाला.

जडेजा आणि अश्विन आज भारताला चांगलेच   महागात  पडलेत.अश्विननं  70 तर जडेजानं 67 धावा दिल्यात आणि एकाही फलंदाजाला त्यांना बाद करता आलं नाही. फलंदाजांची फळी तोडण्यात भारताच्या प्रमुख गोलंदाजांना आज अपयश आलं.

भारताच्या प्रमुख गोलंदाजांना फखर झमान आणि अझर अलीने चांगलंच झोडपलं.बुमराह ,जडेजा आज फखरच्या रडारवर होते.फखरनं सेन्चुरीही मारली .फखरला तंबूत परत पाठवण्यात अखेर हार्दिक पांड्याला यश आलं . त्यांनतर भुवनेश्वर कुमारनं शोएब मलिकला आणि केदार जाधवनं बाबा आझमला तंबूचा रस्ता दाखवला.

सरतेशेवटी पाकिस्ताननं सहा गडी राखत 338 धावांचा डोंगर उभा केला. हफीज आणि अझर अली या  दोघांनीही अर्धशतकं ठोकली.आज हार्दिकनं 53 रन देऊन 1 विकेट घेत ,भुवनेश्वरनं  44 धावा देऊन 1 विकेट घेत बरी कामगिरी केली. त्यातल्या त्यात केदार जाधवनं 27 धावा देत बाबा आझमला बाद करून चुणूक दाखवून दिली .

Loading...

गोलंदाजांच्या खराब प्रदर्शनानंतर सगळी मदार आता भारतीय फलंदाजांवर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 18, 2017 07:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...