Home /News /sport /

Commonwealth Games मध्ये भारताने इतिहास घडवला, लॉन बॉल्समध्ये पहिल्यांदाच गोल्ड

Commonwealth Games मध्ये भारताने इतिहास घडवला, लॉन बॉल्समध्ये पहिल्यांदाच गोल्ड

बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्समध्ये (Commonwealth Games) भारताने इतिहास घडवला आहे. भारताला पहिल्यांदाच लॉन बॉल्समध्ये (Lawn Bowls) गोल्ड मेडल मिळालं आहे.

    बर्मिंघम, 2 ऑगस्ट : बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्समध्ये (Commonwealth Games) भारताने इतिहास घडवला आहे. भारताला पहिल्यांदाच लॉन बॉल्समध्ये (Lawn Bowls) गोल्ड मेडल मिळालं आहे. भारताच्या लव्हली, पिंकी, नयनमोनी आणि रुपा यांनी दक्षिण आफ्रिकेचा महिला फोर फायनलमध्ये 17-10 ने पराभव केला. लॉन बॉल्स या क्रीडा प्रकारामध्ये दक्षिण आफ्रिकेने 3 वेळा कॉमनवेल्थ खेळात गोल्ड मेडल पटकावलं होतं. याच दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. याआधी भारताने सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडचा 16-13 ने पराभव करून फायनल गाठली होती. सेमी फायनलमध्ये भारतीय टीम 0-5 ने पिछाडीवर होती, पण यानंतर टीमने धमाकेदार कमबॅक करत विजय संपादन केला. लॉन बॉल्समध्ये भारताच्या लव्हली चौबे, रुपा राणी टिरकी, पिंकी आणि नयनमोनी साईकिया यांनी भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या