'I RETIRE'...भारतीय महिला बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधूच्या ट्विटमुळे चाहते हैराण

पीव्ही सिंधूने निवृत्ती जाहीर केली?

पीव्ही सिंधूने निवृत्ती जाहीर केली?

  • Share this:
    नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर : भारतातील महिला बॅटमिंटन खेळाडू पीव्ही सिंधू हिने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन 'I RETIRE असं जाहीर केलं आहे. तिच्या या ट्विटवरुन सिंधूने निवृत्ती घेतल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पीव्ही सिंधूने शेअर केलेल्या नोटमध्ये लिहिलं आहे की, मी बऱ्याच दिवसांपासून आपला विचार स्पष्टपणे मांडायचा विचार करीत होते. गेल्या अनेक दिवसांपासून याचा विचार सुरू होता. तुम्हाला माहित आहे...मला साचवून ठेवायला चांगलं वाटत नाही. यासाठी मी आज हे लिहून सांगत आहे. आता अधिक वेळ मी याचा सामना करू शकत नाही. तिने पुढे लिहिलं आहे की, मला माहित आहे, ही नोट वाचून तुम्ही हैराण व्हाल किंवा गोंधळात पडाल. मात्र जेव्हा तुम्ही माझे संपूर्ण विचार वाचाल तेव्हा तुम्हाला ते पटेल. आणि माझी अपेक्षा आहे की तुम्ही माझं समर्थन कराल. हे ही वाचा-'पत्नीसाठी कधी सॅनिटरी नॅपकीन आणलंय का?' राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंचा VIDEO सिंधुने पुढे असंही लिहिलं आहे की, गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या महासाथीमुळे माझे डोळे उघडले. मी स्वत:ला खेळाच्या शेवटपर्यंत सर्वात मजबूत विपक्ष म्हणून ट्रेन करू शकते. मी यापूर्वीही असं केलं आहे. मी पुन्हा असं करू शकते. मात्र या अदृश्य व्हायरसचा समाना कसा करू ज्यामुळे संपूर्ण जगाला ब्रेक लागला आहे. महिन्यांपासून आपण सर्वजण घरात आहोत आणि आजही बाहेर निघालो की जायचं की नाही असा प्रश्न स्वत:ला विचारतो. ती पुढे म्हणते की, अनेक घटना वाचल्या की खूप त्रास होता. मात्र तरीही मी स्वत: या जगाला प्रश्न करीत आहे. मी डेन्मार्क ओपनमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करू शकले नाही, पण असं असलं तरी मी आज ठरवलं की मी सध्याच्या बैचेनीपासून स्वत:ला रिटायर्ड करते. मी निगेटिव्हीटी, सातत्याने भीतीची भावना, अनिश्चिततेपासून निवृत्त होतेय...मी त्या गोष्टीपासून निवृत्त होत आहे ज्या अज्ञात गोष्टींवर माझं नियंत्रण नाही. ती पुढे म्हणाली की, सर्वात विशेष बाब म्हणजे मी व्हायरसकडे दुर्लक्ष करणार नाही. कारण पुढील आयुष्यासाठी आपल्याला तयार राहायला हवं.
    Published by:Meenal Gangurde
    First published: