Mitali Raj Retirement : मितालीची टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती, एका स्वप्नपूर्तीसाठी घेतला निर्णय

टीम इंडियाची दिग्गज महिला खेळाडू आणि माजी कर्णधार मिताली राजनं टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 3, 2019 02:58 PM IST

Mitali Raj Retirement : मितालीची टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती, एका स्वप्नपूर्तीसाठी घेतला निर्णय

नवी दिल्ली, 03 सप्टेंबर : भारतीय महिला क्रिकेटमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाची दिग्गज महिला खेळाडू आणि माजी कर्णधार मिताली राजनं टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र मिताली एकदिवसीय क्रिकेट खेळत राहणार आहे. बीसीसीआयनं याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. मिताली यावेळी, “2006पासून टी-20 क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व आपल्या हाती घेतले होते. आता मात्र टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची वेळ आली आहे. माझे संपूर्ण लक्ष्य 2021 मध्ये होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपकडे आहे”, असे सांगितले.

मिताली राजनं 32 टी-20 सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. यात 2012, 2014 आणि 2016 तीन वर्ल्ड कपमध्ये कर्णधारी केली. 2006मध्ये महिला संघानं पहिला टी-20 सामना खेळला तेव्हा मिताली कर्णधार होती. मितालीनं 89 टी-20 सामने खेळले आहे. यात तिनं 2364 धावा केल्या आहेत, यात 17 अर्धशतकांचा समावेश आहे. 97 हा मितालीचा टी-20 क्रिकेटमधली सर्वोत्ताम खेळी ठरली आहे.

महिला क्रिकेटची सचिन तेंडुलकर अशा नावानं ओळखल्या जाणाऱ्या मितालीनं 9 मार्च2019मध्ये इंग्लंडमध्ये शेवटचा टी-20 सामना खेळला. या सामन्यात 32 चेंडूत 30 धावा केल्या होत्या. दरम्यान दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी मिताली उपलब्ध असणार आहे. त्यामुळं तिला शेवटचा सामना खेळण्याची संधी मिळू शकते.

2021 वर्ल्ड कपसाठी निवृत्तीचा घेतला निर्णय

Loading...

मितालीनं निवृत्तीचे कारण सांगते, 2021मध्ये होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कपच्या तयारीसाठी हा निर्णय घेतले असल्याचे सांगितले. देशासाठी वर्ल्ड कप जिंकणे हे माझे स्वप्न आहे. त्यासाठी मी माझे योगदान देऊ इच्छिते. मला नेहमी प्रोत्साहन देणाऱ्या बीसीसीआयचे मी आभार मानते. भारताच्या टी-20 संघाला मी शुभेच्छा देते”, असे सांगितले.

घोडागाडी शर्यतीत झाला अपघात, रस्ता सोडून लोकांमध्ये घुसले घोडे; थरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 3, 2019 02:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...