Hockey Olympic Qualifiers : भारतीय महिला टीमने रचला इतिहास, ऑलिम्पिकमध्ये झाली एंट्री

Hockey Olympic Qualifiers : भारतीय महिला टीमने रचला इतिहास, ऑलिम्पिकमध्ये झाली एंट्री

आणीबाणीची स्थिती असताना कॅप्टन रानी रामपालने 48व्या मिनिटाला गोल केला आणि भारताने बाजी उलटवली.

  • Share this:

भुवनेश्वर 2 नोव्हेंबर : भारतीय महिला हॉकी संघाने आज इतिहास निर्माण केलाय. कॅप्टन रानी रामपालने (Rani Rampal)  48व्या मिनिटांनी जो गोल केला त्यामुळे भारतीय महिला हॉकी टीमने (Indian Hockey Team) अमेरिकेच्या (USA) विरुद्ध एफआयएच क्वालिफायर्स (FIH Hockey Olympic Qualifier) च्या दुसऱ्या टप्प्यातल्या सामन्यात बाजी मारली. 1-4 ने पराभव झाल्यानंतरही दुसऱ्या टप्प्यातल्या सामन्यांमध्ये दमदार खेळी करत  6-5 ने विजय नोंदवलाय. या विक्रमामुळे पुढच्या वर्षी होणाऱ्या टोकियो (Tokyo) ऑलिम्पिक (Olympic) सामन्यात आपलं स्थान निश्चित केलंय. त्यामुळे  भारतीय महिला संघ तिसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये खेळणार आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघाबाबत शोएब अख्तरचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

भारतीय टीमने शुक्रवारी अमेरिकेला 5-1 ने सपाटून हरवलं होतं. मात्र शनिवार भारतीय संघाचा खेळ ढिला पडला. अमेरिकेने पहिल्या हाफमध्ये 4-0 ने बढत मिळवली. त्यामुळे स्कोअर 5-5 ने बरोबर झाला. अशी आणीबाणीची स्थिती असताना कॅप्टन रानी रामपालने 48व्या मिनिटाला गोल केला. राणीचा तो गोल निर्णायक ठरला आणि शेवटच्या क्षणाला भारतीय संघाने डाव उलटवला.

KBC 11 : आई आजारी होती आणि मी देशासाठी खेळत होते, बिग बींसमोर रडली हिमा दास

अमेरिकेच्या संघाकडून अमांडा मैगडानने दोन तर कॅप्टन  कॅथलीन शार्की आणि अलीसा पारकरने एक एक गोल केला. भारतीय महिला टीमने 1980 मध्ये मॉस्कोत झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यानंतर 36 वर्षांनी रियो ऑलिम्पिकमध्ये आपली स्थान पक्क केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 2, 2019 11:22 PM IST

ताज्या बातम्या