टोकयो, 04 ऑगस्ट: भारतीय महिला हॉकी टीमने (Indian Women Hockey Team) यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) आधीच इतिहास रचला आहे. आता टोकयो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये अर्जेंटिनाला (Argentina) हरवून फायनलमध्ये प्रवेश करण्याचं उद्दिष्ट या टीमने (Indian Women Hockey Match) ठेवलं आहे. आत्मविश्वासाने भारलेल्या 18 सदस्यांच्या भारतीय महिला हॉकी टीमने सोमवारी (2 ऑगस्ट) ऑस्ट्रेलियाच्या (Australia) टीमला 1-0ने हरवून पहिल्यांदाच ऑलिम्पिक स्पर्धेत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. तीन वेळच्या चॅम्पियन असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला नमवल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास आणखीच वाढला आहे. ड्रॅग फ्लिकर गुरजीत कौरने 22व्या मिनिटाला भारताला मिळालेल्या एकमात्र पेनल्टी कॉर्नरला (Penalty Corner) गोलमध्ये (Goal) रूपांतरित केलं आणि तोच शेवटी निर्णायक ठरला. राणी रामपालच्या नेतृत्वाखाली आणि शोर्ड मारीन यांच्या प्रशिक्षणाखाली खेळणाऱ्या भारतीय संघासाठी या मॅचपूर्वीची परिस्थिती प्रतिकूल होती.
भारतीय महिला हॉकी टीमने ऑलिम्पिकमध्ये यापूर्वी सर्वोत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन 1980 सालच्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये केलं होतं. तेव्हा भारतीय टीम सहा टीम्समध्ये चौथ्या स्थानावर होती. महिलांच्या हॉकीची तेव्हा ऑलिम्पिकमध्ये सुरुवात झाली होती. तेव्हाच्या मॅचेस राउंड रॉबिनच्या आधारे खेळल्या गेल्या होत्या. त्यामुळे आघाडीवरच्या दोन टीम्स फायनलमध्ये पोहोचल्या होत्या. आज, बुधवारी (4 ऑगस्ट) भारतीय महिला त्या वेळच्या कामगिरीपेक्षा सरस कामगिरी करून पहिल्यांदाच (India vs Argentina Women's Hockey Semifinal Match Live Streaming) ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये जाण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील. भारतीय पुरुष हॉकी टीम सेमीफायनलमधून (Men Hockey Team) पुढे जाऊ शकली नाही. अंतिम चार टीम्समध्ये समाविष्ट होण्यासाठीच्या सामन्यात भारतीय पुरुष टीमला बेल्जियमकडून 2-5 अशी हार पत्करावी लागली. त्यामुळे आता सगळ्या आशा भारतीय महिलांच्या टीमवर एकवटलेल्या आहेत.
हे वाचा-Lovlina Borgohainचं सुवर्णपदकाचं स्वप्न भंगलं, कांस्यपदकावर मानावं लागणार समाधान
भारतीय महिला टीमने टोकयो ऑलिम्पिकमधल्या कामगिरीनुसार सातवं स्थान मिळवलं आहे. हे भारतीय महिला टीमचं आतापर्यंतचं सर्वांत उत्तम रँकिंग आहे; मात्र या टीमचा सामना जगात दुसऱ्या क्रमांकाची टीम समजल्या जाणाऱ्या अर्जेंटिनाशी (India hockey match schedule) आहे. पाच वर्षांपूर्वी रिओ ऑलिम्पिकमध्ये सेमीफायनलमध्येही जाऊ न शकलेला अर्जेंटिनाचा संघ आता विजयी होण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न करणार हे निश्चित.
गोलकीपर सविताच्या नेतृत्वाखाली भारतीय बचावपटूंनी ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध उत्तम खेळाचं दर्शन घडवलं आणि आपल्या एकमात्र गोलचा उत्तम रीतीने बचाव केला. गुरजीत, दीप ग्रेस एक्का, मोनिका आणि उदिता यांना लॅस लिओन्ससारख्या खेळाडूंना रोखण्यासाठी अशाच तऱ्हेचे प्रयत्न याही मॅचमध्ये करावे लागतील.
अर्जेंटिनाच्या महिला टीमने सिडनीत 2000 साली झालेल्या आणि लंडनमध्ये 2012 साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकलं होतं; मात्र आतापर्यंत ही टीम सुवर्णपदक कमावू शकलेली नाही. 2012 नंतर ही टीम या वेळी प्रथमच सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे. 2016च्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकलेल्या जर्मनीला अर्जेंटिनाच्या टीमने या वेळच्या क्वार्टर फायनलमध्ये 3-0 असं हरवलं. भारतीय टीमने सलग तीन पराजयांनंतर सलग तीन विजय मिळवले आहेत. त्यामुळे या टीममध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे.
हे वाचा-आणखी दोन मेडल्सकडे भारताची वाटचाल,रेसलर दीपक पुनिया आणि रवि दहिया सेमीफायनलमध्ये
भारत आणि अर्जेंटिना या दोन्ही टीम्सच्या कामगिरीची तुलना केली, तर अर्जेंटिनाची बाजू तगडी आहे. या वर्षी ऑलिम्पिकपूर्वी भारतीय महिला टीमने अर्जेंटिनाचा दौरा केला होता. तिथे भारतीय टीम सात मॅचेस खेळली. अर्जेंटिनाच्या युवा टीमविरोधात झालेल्या दोन्ही मॅचेस भारतीय टीमने 2-2 आणि 1-1 अशा अनिर्णित राखल्या. त्यानंतर भारत अर्जेंटिनाच्या बी टीमविरुद्ध खेळला. त्यात भारतीय टीमला 1-2 आणि 2-3 अशी हार पत्करावी लागली. अर्जेंटिनाच्या वरिष्ठ टीमविरुद्ध झालेली पहिली मॅच 1-1 अशी अनिर्णित राखण्यात भारतीय टीमला यश आलं; मात्र त्यापुढच्या दोन मॅचेसमध्ये भारतीय टीमला 0-2 आणि 2-3 असा पराभव स्वीकारावा लागला होता.
'आम्ही सेमीफायनलमध्ये पोहोचून इतिहास रचला आहे. आता आम्ही सेमीफायनलच्या पुढचा विचार करत आहोत. कारण आम्ही इथेच थांबू इच्छित नाही,' असे उद्गार भारतीय महिला हॉकी टीमची कॅप्टन राणीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवल्यावर काढले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Olympics 2021