मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Cricket: धक्कादायक... लंडनमध्ये भारतीय खेळाडूच्या रुममध्ये चोरी, कॅश-दागिने गायब

Cricket: धक्कादायक... लंडनमध्ये भारतीय खेळाडूच्या रुममध्ये चोरी, कॅश-दागिने गायब

भारतीय महिला खेळाडू तानिया भाटियाच्या रुममध्ये चोरी

भारतीय महिला खेळाडू तानिया भाटियाच्या रुममध्ये चोरी

Cricket: भारताची विकेट किपर बॅट्समन तानिया भाटियानं सोशल मीडियात पोस्ट करत तिच्या रुममध्ये चोरी झाल्याचा दावा केला आहे. भारतीय संघ लंडनमधल्या ज्या हॉटेल मॅरिएटमध्ये वास्तव्यास होता तिथं ही घटना घडली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

मुंबई, 26 सप्टेंबर: इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय महिला संघातील खेळाडूबाबत धक्कादायक घटना घडली आहे. भारतीय महिला संघानं इंग्लंडला त्यांच्याच देशात वन डे मालिकेत क्लीन स्वीप देऊन इतिहास घडवला. पण त्यानंतर अवघ्या काही तासात भारताच्या एका खेळाडूनं खळबळजनक दावा केला आहे. तिच्या दाव्यानुसार कुणीतरी हॉटेलमधल्या तिच्या रुममध्ये घुसून चोरी केली आहे. त्यात तिच्या बॅगमधील पैसे आणि दागिने गायब आहेत.

तानिया भाटियाचा खळबळजनक दावा

भारताची विकेट किपर बॅट्समन तानिया भाटियानं सोशल मीडियात पोस्ट करत तिच्या रुममध्ये चोरी झाल्याचा दावा केला आहे. भारतीय संघ लंडनमधल्या ज्या हॉटेल मॅरिएटमध्ये वास्तव्यास होता तिथं ही घटना घडली आहे. तानियानं पोस्टमध्ये लिहिलंय... 'भारतीय महिला क्रिकेट टीमची सदस्य या नात्यानं आम्ही या हॉटेलमध्ये थांबलो होतो. यादरम्यान कुणीतरी माझ्या रुममध्ये प्रवेश केला आणि कॅश, कार्ड, घड्याळ आणि दागिन्यांसह माझी बॅग घेऊन फरार झाला. इथे इतकी असुरक्षितता आहे.'

हेही वाचा - Hardik Pandya: जेव्हा हार्दिक पंड्या पहिल्यांदा सासरच्या मंडळींना भेटतो... हार्दिकनं शेअर केला इमोशनल Video

ECB कडे कारवाईची मागणी

तानियानं आपल्या पोस्टमध्ये इंग्लंड क्रिकेट बोर्डाला (ECB) टॅग करत या प्रकाराची चौकशी आणि कारवाईची मागणी केली आहे. ईसीबीकडून व्यवस्था करण्यात आलेल्या या हॉटेलमध्ये अशा प्रकारची घटना होणं धक्कादायक आहे. दरम्यान ईसीबीनं याबाबतीत कोणतही स्पष्टीकरण अद्याप दिलेलं नाही.

दोन आठवडे भारतीय संघाचं वास्तव्य

सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱ्यावर आला होता. 10 सप्टेंबर ते 24 सप्टेंबरदरम्यान भारतीय संघाचं या हॉटेलमध्ये वास्तव्य होतं. यादरम्यान भारतानं इंग्लंडविरुद्ध तीन टी20 आणि तीन वन डे सामन्यांची मालिका खेळली. शनिवारी भारतीय संघानं इंग्लंडविरुद्ध अखेरचा सामना खेळला. लॉर्डसवर झालेल्या त्या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या वुमन ब्रिगेडनं इंग्लंडला वन डे मालिकेत व्हाईटवॉश देत महान गोलंदाज झुलन गोस्वामीला विजयी निरोप दिला होता.

First published:

Tags: Cricket, Cricket news, Robbery, Sports