S M L

भारताच्या महिला क्रिकेट टीमचा द.आफ्रिकेवर 178 धावांनी दणदणीत विजय

सलामीवीर स्मृती मानधनाच्या तडाखेबाज १३५ धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघानं बुधवारी दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा १७८ धावांनी धुव्वा उडवला.

Sonali Deshpande | Updated On: Feb 8, 2018 11:35 AM IST

भारताच्या महिला क्रिकेट टीमचा द.आफ्रिकेवर 178 धावांनी दणदणीत विजय

08 फेब्रुवारी : सलामीवीर स्मृती मानधनाच्या तडाखेबाज १३५ धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघानं बुधवारी दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा १७८ धावांनी धुव्वा उडवला. या विजयाबरोबरच भारतीय संघाने तीन सामन्यांची मालिका जिंकलीय.

या विजयामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आयसीसी वुमेन्स चॅम्पियनशिपमध्ये २-0 अशी निर्णायक आघाडी घेतलीय. डावखुऱ्या स्मृती मानधनाने १२९ चेंडूंतच केलेल्या १३५ धावांच्या खेळीच्या जोरावर भारतानं ३ बाद ३0२ धावांचा एव्हरेस्ट उभारला. स्मृतीने तिच्या शतकी खेळीत १४ चौकार आणि एक षटकार ठोकला. स्मृतीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडेतील हे दुसरं शतक झळकावलंय. याआधीच्या लढतीत मानधनाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या वनडेतील भारताच्या विजयात ९८ चेंडूंत ८४ धावांची नेत्रदीपक खेळी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 8, 2018 11:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close