बर्मिंगहॅम, 31 जुलै : राष्ट्रकूल स्पर्धेत सांगलीच्या स्मृती मंधनाच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर मोठा विजय मिळवला आहे. स्मृतीने 47 धावांवर असताना षटकार लगावत अर्धशतक ठोकले. भारताने 2 गडी गमावले तेव्हा फक्त 6 धावा लागत होत्या आणि 44 चेंडू शिल्लक होते. स्मृती मंधानाच्या फटकेबाजीने भारताचा विजय सहज बनवला. तिने 42 चेंडूत 63 धावा केल्या. यात 3 षटकार आणि 8 चौकांराचा समावेश आहे. याप्रकारे भारताने 8 गडी राखून पाकिस्तानवर विजय मिळवला.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज रविवारी भारतीय महिला क्रिकेट संघ कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान महिला क्रिकेट संघाविरुद्ध लढत झाली. पावसामुळे ओल्या मैदानामुळे टॉस उशिराने झाला. पाकिस्तानने हा टॉस जिंकला असून त्यांनी फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मात्र, भारतीय महिला संघाने पाकिस्तानच्या संपूर्ण संघाला बाद करत 99 धावांवर रोखलं आहे. हा सामना 18 षटकांचा झाला.
महिला क्रिकेट संघाचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाकडून हरला होता. अशा परिस्थितीत आता सर्वांच्या नजरा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याकडे लागल्या होत्या. त्यात भारताने दणदणीत विजय मिळवला. भारताकडून स्नेह राणा आणि यांनी प्रत्येक दोन तर, रेणुका सिंग, मेघना सिंग आणि शेफाली वर्मा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. तर तीन फलंदाज या धावबाद झाल्या. पाकिस्तानकडून सर्वाधिक 32 धावा मुनीबा अली हिने केल्या. तिने चार चौकार आणि एक षटकार लगावला.
बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर होणाऱ्या या सामन्यात सर्वांच्या नजरा स्मृती मानधना हिच्यावर होत्या. कारण, तिने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तिने चांगली सुरुवात केली होती. मात्र, तिला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तर तिच्या व्यतिरिक्त शेफाली वर्मा आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी उत्कृष्ट खेळी केली होती. तर पाकिस्तानविरुद्धच्या गेल्या 4 टी-20 सामन्यांमध्ये भारतीय संघ अजिंक्य ठरला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, India vs Pakistan, T20 cricket