News18 Lokmat

Commonwealth Weightlifting Championship मध्ये मीराबाई चानूला सुवर्णपदक!

Commonwealth Weightlifting Championshipच्या पहिल्या दिवशी मीराबाई चानूने एकूण 191 किलोग्रॅम वजन उचलत सुवर्णपदक पटकावलं.

News18 Lokmat | Updated On: Jul 9, 2019 05:36 PM IST

Commonwealth Weightlifting Championship मध्ये मीराबाई चानूला सुवर्णपदक!

नवी दिल्ली, 09 जुलै : भारताची माजी वर्ल्ड चॅम्पिय़न वेटलिफ्टर मीराबाई चानूनं कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपच्या पहिल्या दिवशी देशाला सुवर्णपदक पटकावून दिलं आहे. मीराबाई चानूनं वरिष्ठ महिलांमध्ये 49 किलोग्रॅम गटात पहिले स्थान मिळवले. भारताने सिनिअर, ज्यूनियर आणि युथ गटात 13 पदकं पटकावली आहेत.

चानेने स्नॅचमध्ये 84 किलोग्रॅम आणि क्लीन अँड जर्कमध्ये 107 किलोग्रॅम वजनासह एकूण 191 किलोग्रॅम वजन उचललं. ही चॅम्पियनशिप स्पर्धा ऑलिम्पिक पात्रता होती. यात विजयामुळं 2020 ला टोकियो ऑलिम्पिकच्या फायनल रँकिंगसाठी मदत होईल.

मीराबाई चानूनं एप्रिल महिन्यात चीनमध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यातही 199 किलोग्रॅम वजन उचललं होतं. मात्र, तिथं मीराबाईला पदकानं हुलकावणी दिली होती. चानूशिवाय 45 किलो वजनी गटात झिलि दालाबेहरानं एकूण 154 किलोग्रॅम वजन उचलत सुवर्णपदक पटकावलं. मात्र, ऑलिम्पिकसाठी हा वजनगट नाही. सिनिअर महिलांमध्ये 55 किलोग्रॅम गटात सोरोइखाबम देवीने सुवर्ण तर मत्सा संतोषीने रौप्य पदक पटकावलं.

Loading...

EXCLUSIVE VIDEO: पुढचा बाण विधानसभेलाच लागला पाहिजे- सुरेखा पुणेकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 9, 2019 05:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...