मुंबई, 21 डिसेंबर: भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात 26 डिसेंबरपासून बॉक्सिंग डे टेस्टला (Boxing Day)सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ कसून सराव करण्यात व्यस्त आहेत. दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीय संघाने यापूर्वी कधीही टेस्ट सीरिज जिंकलेली नाही. त्यामुळे यंदा टीम इंडियाचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच टेस्ट सीरिज जिंकण्याचे आहे. दरम्यान, या विजयासह भारतीय संघातील काही खेळाडूंकडे इतिहास रचण्याची खास संधी देखील असणार आहे.
विराट कोहली, पुजारा, रहाणे यांसारख्या दिग्गज खेळाडूंकडून टीम इंडियाला मोठी अपेक्षा असणार आहे. या दिग्गच खेळाडूंकडे दक्षिण अफ्रिकेच्या मैदानावर इतिहास रचण्याची संधी आहे.
भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजारा(Cheteshwar pujara) आणि संघाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे(Ajinkya Rahane) हे मोठा विक्रम करण्यापासून काही पाऊल दूर आहेत. हे दोघेही सध्या साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत. परंतु, त्यांना दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध 100 रन पूर्ण करण्याची सुवर्णसंधी आहे. चेतेश्वर पुजाराने आतापर्यंत एकूण 14 टेस्ट मॅचमध्ये 758, तर अजिंक्य रहाणेने 748 धावा केल्या आहेत.
त्येकजण विराट कोहलीकडून 71 व्या आंतरराष्ट्रीय शतकाची अपेक्षा करत आहे. त्याचबरोबर भारतीय कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) 8 हजार टेस्ट रन पूर्ण करण्यासाठी अवघ्या 199 धावांची आवश्यकता आहे. त्याने 97 कसोटी सामन्यात 7801 धावा केल्या आहेत. तसेच त्याला मालिकेतील तिन्ही कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली, तर मालिकेतील शेवटचा सामना हा त्याच्या कारकिर्दीतील 100 वा सामना असणार आहे. तसेच त्याने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत 558 धावा केल्या आहेत.
आर अश्विनलाही दक्षिण आफ्रिकेत मोठा विक्रम करण्याची संधी आहे. आर अश्विनने (R Ashwin)आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 427 गडी बाद केले आहेत. आगामी कसोटी मालिकेदरम्यान, तो रिचर्ड हेडली, रंगना हेरथ आणि कपिल देव यांसारख्या दिग्गजांना मागे सोडू शकतो. डेल स्टेनने कसोटी क्रिकेटमध्ये 439 गडी बाद केले आहेत. या मालिकेत 13 गडी बाद करताच तो डेल स्टेनला ही मागे टाकेल.
भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी(Mohammad Shami) कडे देखील कसोटी क्रिकेटमध्ये 200 गडी बाद करण्याची सुवर्णसंधी असणार आजे. त्याने आतापर्यंत 195 गडी बाद केले आहेत. 5 गडी बाद करताच हा कारनामा करणार आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेत 5 टेस्ट मॅच खेळला आहेत. ज्यामध्ये त्याने 21 गडी बाद केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajinkya rahane, Pujara, R ashwin, South africa, Team india, Virat kohli