मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

U-19 World Cup साठी टीम इंडियाची घोषणा, दिल्लीचा यश ढूल कर्णधार

U-19 World Cup साठी टीम इंडियाची घोषणा, दिल्लीचा यश ढूल कर्णधार

अंडर-19 वर्ल्ड कपसाठी (Under 19 World Cup) भारतीय टीमची रविवारी घोषणा करण्यात आली आहे. चारवेळची चॅम्पियन असलेल्या भारतीय टीमचं नेतृत्व दिल्लीच्या यश ढूल (Yash Dhull) याला देण्यात आलं आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 19 डिसेंबर : अंडर-19 वर्ल्ड कपसाठी (Under 19 World Cup) भारतीय टीमची रविवारी घोषणा करण्यात आली आहे. चारवेळची चॅम्पियन असलेल्या भारतीय टीमचं नेतृत्व दिल्लीच्या यश ढूल (Yash Dhull) याला देण्यात आलं आहे, तर आंध्र प्रदेशचा एसके रशीद उपकर्णधार असेल. पुढच्या वर्षी 14 जानेवारीपासून अंडर-19 वर्ल्ड कपला वेस्ट इंडिजमध्ये सुरुवात होणार आहे. 5 फेब्रुवारीला वर्ल्ड कपची फायनल होईल.

अखिल भारतीय ज्युनियर निवड समितीने आयसीसी अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कपसाठी (ICC U-19 Men’s Cricket World Cup) भारतीय टीमची निवड केली. स्पर्धेचा हा 14 वा मोसम आहे, यात 16 टीम सहभागी होणार आहेत आणि 48 मॅच खेळवल्या जातील. भारताने 2000, 2008, 2012 आणि 2018 साली भारताने अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला होता. सर्वाधिक वर्ल्ड कप जिंकण्याचा विक्रमही भारताच्याच नावावर आहे. टीम इंडिया 2016 साली न्यूझीलंडमध्ये झालेल्या आणि 2020 सालच्या स्पर्धेत उपविजेती होती.

अंडर-19 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम

यश ढूल (कर्णधार), हरनूर सिंग, अंगक्रिश रघुवंशी, एसके रशीद (उपकर्णधार), निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, अनीश्वर गौतम, दिनेश बाना, आराध्य यादव (विकेटकीपर), राज अंगद बाव, मानव पारखी, कौशल तांबे, आरएस हैंगरगेकर, वासू वत्सो, विक्की ओस्तवाल, रवी कुमार आणि गर्व सांगवान

First published: