टीम इंडियाच्या बॅटिंग कोचसाठी ‘या’ दिग्गजांमध्ये शर्यत, कोण मारणार बाजी!

टीम इंडियाच्या बॅटिंग कोचसाठी ‘या’ दिग्गजांमध्ये शर्यत, कोण मारणार बाजी!

टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफची निवड लवकरच कऱण्यात येणार असून याबाबत 22 ऑगस्टला जाहीर केले जाणार आहे.

  • Share this:

मुंबई, 20 ऑगस्ट : भारताच्या क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. आता सपोर्ट स्टाफची निवड लवकरच कऱण्यात येणार असून याबाबत 22 ऑगस्टला जाहीर केले जाणार आहे. कपिल देव यांच्या अध्यक्षतेखाली क्रिकेट सल्लागार समितीनं मुख्य प्रशिक्षकासह सपोर्ट स्टाफ निवडण्याची परवानगी मागितली होती. मात्र, ही मागणी फेटाळून लावण्यात आली.

टीम इंडियासाठी सपोर्ट स्टाफ निवडण्याची जबाबदारी एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती करणार आहे. ही निवड प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे. 22 ऑगस्टला सपोर्ट स्टाफमधील नावे जाहीर केली जातील. त्याच दिवशी भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.

दरम्यान, भारताच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज केलेल्या लालचंद राजपूत यांनी भारताच्या फलंदाजी प्रशिक्षकासाठी आता अर्ज केला आहे. यासाठी सोमवारी त्यांनी अर्ज केला. मात्र या जागेसाठी विक्रम राठोड आणि संजय बांगर यांचे नाव आघाडीवर आहे.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार गुरुवारी सपोर्ट स्टाफची निवड प्रक्रिया पूर्ण होईल. त्याच दिवशी नावे जाहीर केली जातील. बीसीसीआयच्या नव्या नियमांनुसार टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफची निवड मुख्य निवडकर्त्यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यांची समिती करते. तर मुख्य प्रशिक्षकाची निवड क्रिकेट सल्लागार समिती करते.

वाचा-तब्बल 8 महिन्यांनंतर तळपली रहाणेची बॅट! पण धिमी फलंदाजी अडचणीची

बांगर यांच्या जागेला धोका

रवी शास्त्री यांची मुख्य प्रशिक्षक पदी निवड झाली असली तरी, इतर स्टाफमध्ये बदल करण्यात येणार आहे. दरम्यान गोलंदाजीसाठी भरत अरूण आणि क्षेत्ररक्षणसाठी आर श्रीधर यांचे नाव आघाडीवर आहे. तसेच सध्याचे फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर यांची जागा धोक्यात आली आहे. बांगर 2014पासून भारतीय संघासोबत आहेत. त्यांनी भारतासाठी 50 कसोटी आणि 119 एकदिवसीय सामने खेळले आहेत.

वाचा-शोएब मलीकनंतर पाकिस्तानचा ‘हा’ क्रिकेटपटू आज होणार भारताचा जावई!

आमरे, कानिटकर, मन्हास यांनी दिल्या मुलाखती

भारताची फलंदाजी सर्वोत्तम असली तरी चौथ्या क्रमांकाचा प्रश्न भारताला सोडवता आलेला नाही. यामुळं बांगर यांना किंमत चुकवावी लागेल. फलंदाजीच्या प्रशिक्षकासाठी विक्रम राठोड आघाडीवर असल्याचं म्हटलं जात आहे. राहुल द्रविडची त्यांच्या नावाला पसंती आहे. राठोड यांना इंडिया ए च्या फलंदाजी प्रशिक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. विक्रम राठोड यांच्याशिवाय मार्क रामप्रकाश, अमोल मजूमदार, ऋषिकेश कानिटकर, प्रविण आमरे, लालचंद राजपूत, थिल्लन समरावीरा यांनीही अर्ज केले आहेत.

वाचा-‘आम्ही अणुबॉम्ब वापरू, भारताला एका फटक्यात साफ करू’; माजी पाक खेळाडू बरळला

VIDEO: इस्रोने रचला नवा इतिहास; 7 सप्टेंबरला 'चंद्रयान-2' चंद्रावर उतरणार

Published by: Akshay Shitole
First published: August 20, 2019, 11:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading