Home /News /sport /

ISL 7: कोरोना व्हायरसमध्ये 9 महिन्यांनंतर भारतात होणार ‘ही’ लीग, असे असणार नियम

ISL 7: कोरोना व्हायरसमध्ये 9 महिन्यांनंतर भारतात होणार ‘ही’ लीग, असे असणार नियम

लॉकडाऊननंतर देशात आयोजित होणारी ही पहिली सर्वात मोठी स्पर्धा आहे.

    बेम्बोलिम, 20 नोव्हेंबर : कोरोनामुळे भारतात मागील 9 महिन्यांपासून कोणत्याही प्रकारच्या क्रीडा स्पर्धा झालेल्या नाहीत. मात्र आजपासून इंडियन सुपर लीग फुटबॉल (ISL) स्पर्धेला सुरुवात होत आहे. कोरोनाच्या या संकटामुळे मोकळ्या स्टेडियमध्ये ही संपूर्ण स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. लॉकडाऊननंतर देशात आयोजित होणारी ही पहिली सर्वांत मोठी स्पर्धा आहे. गोव्यातील जीएमसी स्टेडियममध्ये गतविजेते एटीके मोहन बागान आणि केरळ ब्लास्टर्स यांच्यातील सामन्याने या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या हंगामाला आजपासून सुरुवात होणार असून सर्वांत मोठी मॅच 27 नोव्हेंबरला एटीके मोहन बागान आणि एससी ईस्ट बंगाल यांच्यामध्ये रंगणार आहे. यामध्ये दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी आपल्या 100 वर्षांच्या खेळातील वैमनस्याला नवीन स्वरूप देणार आहेत. मागील वर्षाचे आयएसएल विजेते एटीके आणि आयलीग टीम मोहन बागान यांच्या विजयानंतर हा संघ या स्पर्धेत विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. या संघाने भारताचा स्टार डिफेंडर संदेश झिंगन सारख्या प्रतिभावान खेळाडूंशी करार केला आहे. त्याचबरोबर मागील वर्षीच्या काही खेळाडूंना देखील संघात कायम ठेवले आहे. वाचा-क्रिस गेलची लंका प्रीमियर लीगमधून माघार, कर्णधार बनणारा खेळाडूही बाहेर फिजीच्या रॉय कृष्णा याला देखील संघात कायम ठेवण्यात आले असून मागील सत्रात 21 मॅचमध्ये 15 गोल करत तो सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला होता. रॉयने फायनलमध्ये कर्णधारपद देखील सांभाळलं होतं. त्यामुळे संघाला तिसरं विजेतेपद मिळवून देण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. कोच एंटोनियो हबास यांनी रॉय याच्याबरोबरच या सत्रात स्पेनचा मीडफील्डर एडू गार्सिया, भारताचा प्रीतम कोटल, अरिंदम भट्टाचार्य यांना संघात घेतलं असून, झिंगनला कर्णधार म्हणून निवडले आहे. वाचा-IPL 2020 : नेहराच्या टीममध्ये विराटऐवजी सूर्या, तर मुंबईच्या या खेळाडूंना संधी दुसरीकडे मागीलवर्षी लीगच्या सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी करून एएफसी चॅम्पियन्स लीगसाठी पात्र ठरलेल्या एफसी गोवासाठी हे सत्र थोडे अवघड आहे. आपल्या स्टार फॉरवर्ड फेरान कोरोमिनास आणि ह्यूगो बोमस यांच्या अनुपस्थितीत त्यांना मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. हे दोन खेळाडू स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आहेत. कार्ल्स कुआड्रेट यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा बेंगळुरू एफसी देखील यावर्षी विजयाचा प्रबळ दावेदार आहे. 2018-19 मध्ये विजेतेपद मिळवणाऱ्या या संघातील अनेक खेळाडूंना कुआड्रेट बांधून ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. दोनवेळा गोल्डन ग्लोव विजेता गुरप्रीतसिंह संधू आणि भारतीय संघातील सुनील छेत्री याच्याबरोबरच डिफेंडर युआनन, मीडफील्डर एरिक पार्तालु आणि दिमास डेलगाड यांसारख्या खेळाडूंचा संघात समावेश आहे. मुंबई सिटी एफसी देखील यावर्षी कमीतकमी प्लेऑफमध्ये जागा मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. मुंबईचा मुख्य कोच सर्जियो लोबेरा यांच्यावर विश्वास आहे. नुकतेच त्यांनी गोव्याची साथ सोडून मुंबईबरोबर करार केला आहे. सर्जियो लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली 2018-19 च्या सत्रात गोव्याच्या संघाने फायनलमध्ये मजल मारली. वाचा-विराट नसताना रहाणेला कर्णधार केलं तर... पॉण्टिंगने दिला धोक्याचा इशारा दरम्यान, लिव्हरपूलचे रॉबी फाउलर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या नवीन संघ ईस्ट बंगाल आणि दोन वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नईयन एफसी या संघांनादेखील चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. नोव्हेंबरपासून मार्चपर्यंत सुरु राहणारी ही स्पर्धा कोरोनामुळे केवळ गोव्यात खेळवली जाणार आहे. यामध्ये 11 संघांना 3 ग्रुपमध्ये विभागण्यात आले असून ए ग्रुपमध्ये चार संघ असून बी आणि सी मध्ये प्रत्येकी 3 संघ असणार आहेत.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या