ठरलं! ‘या’ तारखेपासून सुरू होणार IPLचा धमाका, मुंबईत पडणार चौकार-षटकारांचा पाऊस

ठरलं! ‘या’ तारखेपासून सुरू होणार IPLचा धमाका, मुंबईत पडणार चौकार-षटकारांचा पाऊस

जगातील सर्वात मोठी लीग म्हणून ओळखली जाणाऱ्या आयपीएलच्या तेराव्या हंगामाची तारिख निश्चित झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 31 डिसेंबर : जगातील सर्वात मोठी लीग म्हणून ओळखली जाणाऱ्या आयपीएलच्या तेराव्या हंगामाची तारिख निश्चित झाली आहे. मिडीया रिपोर्टनुसार आयपीएलच्या 13व्या हंगामाला 29 मार्चपासून सुरुवात होणार आहे. यातील पहिला सामना वानखेडे मैदानावर होणार आहे. गजविजेते मुंबई इंडियन्स आपल्या घरच्या मैदानावर आयपीएलच्या नव्या हंगामाचा शुभारंभ करतील.

मात्र, आयपीएलच्या हंगामाला मार्चपासून सुरुवात होणार असल्यामुळं ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंना फटका बसण्याची शक्यता आहे. कारण याचदरम्यान ऑस्ट्रेलिया आणि न्यूजीलंड यांच्यात टी-20 तर इंग्लंड-श्रीलंका यांच्याच कसोटी मालिका होणार आहे. त्यामुळं या संघाचे खेळाडू सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहेत.

वाचा-क्रिकेट मैदानाबाहेर लागली भीषण आग, विझवण्यासाठी मॅक्लवेलनं टाकला जीव धोक्यात

कोलकाता संघाला सहन करावे लागणार मोठे नुकसान

कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यात सर्वात जास्त नुकसान होईल. कारण कोलकाता नाईट रायडर्सने लिलाव करताना पॅट कमिन्सवर विक्रमी 15.50 कोटींची बोली लावली होती. त्यामुळं मार्चमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्यामुळं राष्ट्रीय संघांकडून खेळण्यात व्यस्त असल्याने ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंका मधील दिग्गजांना आयपीएलच्या सुरुवातीच्या टप्प्यात खेळता येणार नाही. अशा स्थितीत फ्रँचायझींना मोठा तोटा सहन करावा लागू शकतो.

वाचा-भारताला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूवर बंदी

फ्रँचायझींना 1 एप्रिलपासून स्पर्धा सुरू करायची आहे

आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल जुन्या वेळापत्रकानुसार एप्रिलपासून इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सत्राची सुरुवात करेल, अशी फ्रँचायझींना आशा होती. कारण ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड टी -20 मालिका 29 मार्च रोजी संपेल, तर इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील दुसरी कसोटी सामना 31 मार्चपर्यंत संपेल. अशा परिस्थितीत आपल्या मोठ्या खेळाडूंशिवाय स्पर्धा सुरू करणे चांगले नाही. यामुळंच संघांना 1 एप्रिलपासून आयपीएलची सुरुवात करायची होती.

वाचा-ICC कसोटी क्रिकेटमध्ये आणणार नवा ट्विस्ट, बदलणार 142 वर्षांपूर्वीचा नियम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 31, 2019 10:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading