मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेत कोरोना रुग्ण वाढले तर काय? CSA ने टीम इंडियाला दिली 'गॅरेंटी'

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेत कोरोना रुग्ण वाढले तर काय? CSA ने टीम इंडियाला दिली 'गॅरेंटी'

भारतीय क्रिकेट टीम सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India vs South Africa) आहे. 26 डिसेंबरपासून सेंच्युरियनमध्ये पहिल्या टेस्टला सुरुवात होणार आहे, पण कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनमुळे (Omicron) दौऱ्यावर संकट आहे.

    मुंबई, 22 डिसेंबर : भारतीय क्रिकेट टीम सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India vs South Africa) आहे. 26 डिसेंबरपासून सेंच्युरियनमध्ये पहिल्या टेस्टला सुरुवात होणार आहे, पण कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनमुळे (Omicron) दौऱ्यावर संकट आहे. दौरा अर्ध्यातच स्थगित करावा लागला आणि आफ्रिकेची सीमा बंद करावी लागली तर भारतीय खेळाडूंना (Team India) त्यांच्या घरी पोहोचवलं जाईल, अशी हमी क्रिकेट साऊथ आफ्रिकाने दिली आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरियंट मिळाल्यामुळे हा दौरा धोक्यात आला होता, पण बीसीसीआय (BCCI) आणि क्रिकेट साऊथ आफ्रिकाने (CSA) ही सीरिज खेळवण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या संकटात दोन्ही देशांनी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला असला तरी दौरा सुरू व्हायला उशीर झाला, त्यामुळे टी-20 सीरिज स्थगित करण्यात आली. 10 दिवसांनी हा दौरा पुढे ढकलण्यात आला. सुरुवातीला दौऱ्याची सुरुवात 17 डिसेंबरला होणार होती, पण आता सीरिज 26 डिसेंबरपासून सुरू होईल. न्यूज 23 डॉट कॉमने सीएसएचे मुख्य चिकित्सा अधिकारी शुएब मांजरा यांच्या हवाल्याने सांगितलं, 'जर कोणत्याही भारतीय खेळाडूला रुग्णालयात दाखल करावं लागलं, तर आम्ही काही रुग्णालयांशी संपर्क केला आहे, त्यांना या रुग्णालयांमध्ये बेडची गॅरेंटी आम्ही देत आहोत.' 'जर स्वदेशात परतण्याच्या सीमा बंद केल्या गेल्या तर खेळाडूंना भारतात परत पाठवण्याची परवानगी देण्यात येईल, अशी हमी सरकारने दिली आहे, पण भारत सरकार याबाबत काय करणार, ते आमच्या हातात नाही. आमचा आंतरराष्ट्रीय आणि सहयोग विभाग भारत सरकारसोबत चर्चा करत आहे,' असं मांजरा म्हणाले. 'खेळाडूंची सुरक्षा आणि घरी परत जाण्यासाठी जे उपाय गरजेचे आहेत ते आम्ही सगळे केले आहेत. भारतीय टीम इकडे फक्त सुरक्षितच नाहीत, तर त्यांना घरी जायचं असेल तर त्यांच्यासाठी रस्तेही खुले आहेत,' असं वक्तव्य मांजरा यांनी केलं आहे. कोरोना व्हायरसमुळे भारत आणि दक्षिण आफ्रिकेतल्या सगळ्या मॅच बायो-बबलमध्ये प्रेक्षकांशिवाय होणार आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: South africa, Team india

    पुढील बातम्या