मेलबर्न, 18 मे : वेस्ट इंडिजविरुद्धच्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजसाठी ऑस्ट्रेलियन टीमची (Australia vs West Indies) निवड करण्यात आली आहे. 9 जुलैपासून या सीरिजला सुरूवात होईल. वेस्ट इंडिज दौऱ्यात ऑस्ट्रेलियन टीम 5 टी-20 आणि 3 वनडे मॅचची सीरिज खेळेल. ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये भारतीय वंशाच्या 19 वर्षीय तनवीर संघा (Tanveer Sangha) याची निवड करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये निवड झालेला तनवीर संघा हा भारतीय मूळ असणारा चौथा खेळाडू आहे. गुरिंदर सिंग संधू हा 2015 साली भारताविरुद्ध मेलबर्नमध्ये खेळला होता. संधूचे पालक हे पंजाबी होते. तर स्टुअर्ट क्लार्क आणि ब्रान्सबाय कूपर हे दोघं भारतात जन्मलेले होते, पण तनवीर संघा याचा इथपर्यंतचा प्रवास संघर्षमय राहिला.
बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडरकडून खेळताना तनवीर संघा जबरदस्त फॉर्ममध्ये होता. 14 सामन्यांमध्ये त्याने 21 विकेट घेतल्या. तनवीर संघाच्या लेग स्पिनने ऑस्ट्रेलियातल्या अनेक बॅट्समनना चकवा दिला आहे.
तनवीर संघा हा भारतीय वंशाच्या टॅक्सी ड्रायव्हरचा मुलगा आहे. तनवीरचे वडील जोगा सिंग 1997 साली ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले. जोगा सिंग हे मूळचे पंजाबच्या जलंधरचे होते. तनवीरचा जन्म 2001 साली सिडनीमध्ये झाला.
ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर फवाद अहमद याने तनवीरची बॉलिंग बघितली. तनवीरने त्याची क्रिकेट कारकिर्द फास्ट बॉलर म्हणून सुरू केली, पण नंतर त्याला आपण लेग स्पिन चांगला टाकू शकतो, हे जाणवलं. सिडनी क्लबमध्ये तनवीरने वयोगटातल्या क्रिकेटमध्ये छाप पाडली, त्यामुळे 2020 साली ऑस्ट्रेलियाच्या अंडर-19 वर्ल्ड कप टीममध्ये त्याची निवड झाली.
अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये तनवीर संघाने 6 सामन्यांमध्ये 15 विकेट घेतल्या होत्या, यातल्या दोन सामन्यांमध्ये त्याने प्रत्येकी 4-4 विकेट मिळवल्या, तर नायजेरियाविरुद्ध संघाने 14 रन देऊन 5 विकेट घेण्यात यश मिळवलं.
ऑस्ट्रेलियन टीम
एरॉन फिंच (कर्णधार), एलेक्स कॅरी, स्टीव स्मिथ, एश्टन एगर, जेसन बेहरडॉर्फ, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जॉश हेजलवूड, मोइसेस हेनरिक्स, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, रिले मेरिडिथ, जॉश फिलीपी, झाय रिचर्डसन, केन रिचर्डसन, तनवीर संघा, डार्सी शॉर्ट, मार्कस स्टॉयनिस, स्वेपसन, एंड्रयू टाय, मैथ्यू वेड, एडम झम्पा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Australia, Cricket news, T20 cricket