भारतीय हाॅकी संघाचा रोमहर्षक विजय

भारतीय हाॅकी संघाचा रोमहर्षक विजय

भारतीय हॉकी संघानं त्यांच्या युरोप दौऱ्याची सांगता विजयानं केलीये, गुरुवारी झालेल्या लढतीत भारतानं, ऑस्ट्रेलियाचा ४-३ असा पराभव केला.

  • Share this:

अमित मोडक, 18 आॅगस्ट : भारतीय हॉकी संघानं त्यांच्या युरोप दौऱ्याची सांगता विजयानं केलीये, गुरुवारी झालेल्या लढतीत भारतानं, ऑस्ट्रेलियाचा ४-३ असा पराभव केला.शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या लढतीत, चिंगलेनसाना यानं सामना संपायला १० सेकंद बाकी असताना केलेल्या गोलच्या जोरावर भारतीय संघानं हा सामना खिशात घातला.

पहिल्या हाफ पर्यंत भारताकडे ३-१ अशी आघाडी होती. पण दुसऱ्या हाफमध्ये ऑस्ट्रेलियानं जोरदार मुसंडी मारत ३-३ अशी बरोबरी साधली. पण चिंगलेनसानाच्या गोलच्या जोरावर भारतानं शेवटच्या १० सेकंदात विजय मिळवला. या दौऱ्यात भारतानं नेदरलंडविरुद्धही दोन विजय मिळवले.

First published: August 18, 2017, 11:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading