अहमदाबाद, 2 मार्च : भारतामध्ये कोरोना लस द्यायच्या (Corona Vaccination) तिसऱ्या टप्प्याला सोमवार 1 मार्चपासून सुरूवात झाली. 60 वर्षांवरील व्यक्ती आणि 45 वर्षांच्यावर ज्यांना सहव्याधी आहेत, अशांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह काही नेत्यांनी पहिल्याच दिवशी कोरोनाची लस टोचून घेतली. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनाही कोरोना लशीचा पहिला डोस देण्यात आला. अहमदाबादच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये रवी शास्त्री यांनी लस घेतली.
कोरोनाची लस घेतानाचा फोटो रवी शास्त्रींनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेयर केला आहे. या फोटोमध्ये रवी शास्त्रींनी टीम इंडियाची जर्सी घातली आहे. तर त्यांच्या बाजूला उभी असलेली महिला पीपीई कीट घालून त्यांना लस देताना दिसत आहे.
लस घेतानाचा फोटो ट्विट करताना रवी शास्त्री म्हणाले, 'कोव्हिड-19 लशीचा पहिला डोस घेतला. महामारीविरुद्ध भारताला सशक्त बनवण्यासाठी वैज्ञानिकांना धन्यवाद. अहमदाबादमध्ये कांताबेन आणि त्यांच्या अपोलो टीमला पाहून खूप प्रभावित झालो.'
Got the first dose of COVID-19 vaccine. Thank you to the amazing medical professionals & scientists for empowering India 🇮🇳 against the pandemic.
Extremely impressed with the professionalism shown by Kantaben & her team at Apollo, Ahmedabad in dealing with COVID-19 vaccination pic.twitter.com/EI29kMdoDF — Ravi Shastri (@RaviShastriOfc) March 2, 2021
भारतीय क्रिकेट टीम सध्या अहमदाबादमध्ये आहे. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टला 4 मार्चपासून सुरूवात होणार आहे. यानंतर याच मैदानात पाच टी-20 मॅचची सीरिजही होईल.
सोमवारी लसीकरण सुरू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीच्या एम्समध्ये जाऊन पहिली लस घेतली. मोदींनंतर अमित शाह, वैंकय्या नायडू यांच्यासह बड्या नेत्यांनीही कोरोना लशीचा पहिला डोस घेतला. 60 वर्षांवरचे नागरिक आणि सहव्याधी असलेल्या 45 वयापेक्षा जास्तच्या नागरिकांना कोरोना लस देण्यात येणार आहे. सरकारी केंद्रांवर कोरोनाची ही लस फुकट देण्यात येणार आहे, तर खासगी केंद्रांवर यासाठी 250 रुपये भरावे लागणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Ravi shashtri, Team india