मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /भारताच्या महिला जिम्नॅस्टपटूवर उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणी कारवाई

भारताच्या महिला जिम्नॅस्टपटूवर उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणी कारवाई

2021 मध्ये स्पर्धेपूर्वी खेळाडूंच्या होणाऱ्या उत्तेजक द्रव्य चाचणीत दीपाने हायजेनामाइनचे सेवन केल्याचे समोर आले होते. त्यामुळे तिला 21 महिन्यांसाठी निलंबित केल्याची माहिती शुक्रवारी आंतरराष्ट्रीय टेस्टिंग संघटनेकडून देण्यात आली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 4 जानेवारी : भारताची महिला जिम्नॅस्टपटू दीपा कर्माकर हिला उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणी आंतरराष्ट्रीय टेस्टिंग संघटनेकडून दोषी ठरवण्यात आले आहे. तसेच तिच्यावर या प्रकरणी कारवाई करण्यात आली असून 21 महिन्यांसाठी तिला निलंबित करण्यात आले आहे.

2021 मध्ये स्पर्धेपूर्वी खेळाडूंच्या होणाऱ्या उत्तेजक द्रव्य चाचणीत दीपाने हायजेनामाइनचे सेवन केल्याचे समोर आले होते. त्यामुळे तिला 21 महिन्यांसाठी निलंबित केल्याची माहिती शुक्रवारी आंतरराष्ट्रीय टेस्टिंग संघटनेकडून देण्यात आली. परंतु दीपावर ही निलंबनाची कारवाई 2021 च्या ऑक्टोबर महिन्यात पासूनच सुरु झाल्यामुळे 10 जुलै 2023 रोजी तिला देण्यात आलेली निलंबनाची शिक्षा संपेल.

हे ही वाचा  : भारतीय क्रिकेटरच्या पत्नीला लाखो रुपयांचा चुना! जाब विचारल्याने मिळाली जीवे मारण्याची धमकी

कोण आहे दीपा कर्माकर?

त्रिपुराची दीपा कर्माकर ही भारतातील टॉप जिम्नॅस्टपैकी एक आहे. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये ती चौथ्या स्थानावर राहिली होती.  चौथ्या स्थानापर्यंत मजल मारणारी दीपा ही भारताची पहिलीच खेळाडू ठरली होती. यानंतर, 2018 मध्ये, तिने तुर्कीमधील मर्सिन येथे झालेल्या FIG आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड चॅलेंज कपच्या व्हॉल्ट स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले, अशी कामगिरी करणारी ती भारतातील पहिली जिम्नॅस्ट ठरली. दीपा कर्माकर हिला 'गोल्डन गर्ल' म्हणूनही ओळखले जाते.

काय आहे हायजेनामाइन?

युनायटेड स्टेट्स अँटी-डोपिंग एजन्सी (यूएसएडीए) नुसार, हायजेनामाइनमध्ये मिश्रित अॅड्रेनर्जिक रिसेप्टर क्रियाकलाप आहे, याचा अर्थ असा होतो की ते सामान्य उत्तेजक म्हणून कार्य करू शकते. 2017 मध्ये WADA च्या प्रतिबंधित पदार्थांच्या यादीत त्याचा समावेश करण्यात आला होता. हायजेनामाइन दमाविरोधी म्हणून काम करू शकते. हे कार्डिओटोनिक देखील असू शकते, याचा अर्थ म्हणजे कार्डियक आउटपुट वाढवण्यासाठी हे हृदयाची गती मजबूत करते.

First published:

Tags: Sports