बुमराहने तोडला विराटचा विश्वास! 4 वर्षातल्या सगळ्यात वाईट रेकॉर्डची नोंद

बुमराहने तोडला विराटचा विश्वास! 4 वर्षातल्या सगळ्यात वाईट रेकॉर्डची नोंद

बुमराहचा फॉर्म भारतासाठी चिंतेचे विषय ठरत आहे. टी-20 वर्ल्ड कपआधी बुमराहला चांगली कामगिरी करावी लागली.

  • Share this:

हेमिल्टन, 30 जानेवारी : भारत-न्यूझीलंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं सुपरओव्हरमध्ये सामना जिंकला. रोहित शर्माच्या दोन षटकारांच्या जोरावर भारातनं ऐतिहासिक विजय मिळवला. मात्र भारत खरतर हा सामना आधीच जिंकू शकला असता. भारतानं दिलेल्या 180 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला शेवटच्या चार ओव्हरमध्ये 43 धावांची गरज होती. या चार ओव्हरपैकी दोन ओव्हर जगातला सर्वात श्रेष्ठ गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) देण्यात आल्या. त्यामुळं बुमराहचा रेकॉर्ड पाहता भारताला विजय जवळजवळ निश्चित होता.

मात्र या चार ओव्हरमध्ये भलताच प्रकार घडला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनच्या डोक्यात काही वेगळे होते. जसप्रीत बुमराहने शेवटच्या दोन ओव्हरमध्ये 25 धावा दिल्या. त्यामुळं न्यूझीलंडचा संघ विजयाच्या एक पाऊल पुढे पोहचला. मोहम्मद शमीच्या 20व्या ओव्हरमुळे भारतानं न्यूझीलंडच्या तोंडचा घास पळवला आणि सामना अनिर्णित राहिला. त्यामुळं दुखापतीनंतर कमबॅक करत असलेल्या बुमराहची गोलंदाजी विराटसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

वाचा-…तर रोहित सुपर ओव्हरसाठी मैदानात उतरलाच नसता, ती 5 मिनिटं विराट नाही विसरणार!

एवढेच नाही तर सुपर ओव्हरमध्ये विराटनं बुमराहच्या हाती चेंडू दिला. मात्र बुमराहनं 6 चेंडूत 17 धावा दिल्या. यावेळी रोहित शर्मा संकोटमोचक म्हणून पुढे आला. नाही तर भारताला मोठा फटका बसू शकला असता. जसप्रीत बुमराहला झालेल्या दुखापतीमुळे त्याला दोन महिने क्रिकेट खेळला आले नव्हते. त्यामुळं दुखापतीतून सावरत पुन्हा कमबॅक करणाऱ्या बुमराहला आपले यॉर्करचे अस्त्र पुन्हा वापरावे लागणार आहे. कारण टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने बुमराहचा फॉर्म भारतासाठी महत्त्वाचा आहे.

वाचा-VIDEO : ...आणि रोहितने 'मराठमोळ्या’ स्टाईलमध्ये सांगितले सुपर ओव्हरचं सिक्रेट!

न्यूझीलंडला कळले बुमराहचे सिक्रेट

भारतीय संघाने सामना आणि मालिका जिंकली असली तर भारताची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण महत्त्वाचा विषय ठरत आहे. बुमराह हा यॉर्कर आणि स्लो बॉलसाठी ओळखला जातो. या क्षमतेमुळे त्याला जागतिक क्रिकेटमध्ये सर्वोत्तम गोलंदाज मानले जाते. मात्र पहिल्या चार ओव्हरमध्ये 45 धावा आणि सुपर ओव्हरमध्ये 17 धावा दिलेल्या बुमराहवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

वाचा-सुपर ओव्हरमध्ये कोणाच्या चुकीमुळे घडला चमत्कार? रोहित शर्माने केला खुलासा

चार वर्षांपूर्वी केली होती अशी कामगिरी

तिसर्‍या सामन्यात जसप्रीत बुमराहने केलेली कामगिरी भारतासाठी चिंताजनक आहे, कारण 4 वर्षांआधी बुमराहबाबत असाच प्रकार घडला होता. हॅमिल्टन टी -20 सामन्यात जसप्रीत बुमराहने चार षटकांत 10.5 च्या सरासरीने 45 धावा दिल्या. यापेक्षा वाईट कामगिरी बुमराहनं 2016मध्ये केली होती. अमेरिकेच्या लॉडरहिल येथे वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने चार षटकांत 47 धावा दिल्या. हा सामना 27 ऑगस्ट रोजी खेळला गेला.

First published: January 30, 2020, 3:46 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या