Home /News /sport /

जडेजाची बॅटिंग पाहिल्यानंतर चाहत्यांनी संजय मांजरेकरांना सुनावलं, ‘बिट्स अँड पिसेस’ प्रसंगाची आठवण काढत केलं ट्रोल

जडेजाची बॅटिंग पाहिल्यानंतर चाहत्यांनी संजय मांजरेकरांना सुनावलं, ‘बिट्स अँड पिसेस’ प्रसंगाची आठवण काढत केलं ट्रोल

रवींद्र जडेजाने(ravindra jadeja) हार्दिक पांड्याच्या बरोबर मोठी पार्टनरशिप करत भारताला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली.

    नवी दिल्ली, 2 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया(IND Vs AUS) यांच्यात सुरू असलेल्या क्रिकेट मालिकेमध्ये तिसऱ्या मॅचमध्ये भारतीय संघाने टॉस जिंकत बॅटिंगचा पर्याय निवडला. त्यानंतर बॅटिंगला मैदानात आलेल्या भारतीय संघाला सुरुवातीलाच धवनच्या रूपाने मोठा धक्का बसला. त्यानंतर शुभमन गिल आणि कोहलीने भागीदारी करत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण भारत एकवेळ 5 आउट 152 रन्स असा संघर्ष करत होता. त्यानंतर बॅटिंगसाठी मैदानात आलेल्या रवींद्र जडेजाने(ravindra jadeja) हार्दिक पांड्याच्या बरोबर मोठी पार्टनरशिप करत भारताला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. धवन आऊट झाल्यानंतर विराट कोहलीने(virat kohli) एक बाजू लावून धरत शानदार खेळी करत 78 बॉलमध्ये 63 रन्स करत भारताचा डाव सावरला. परंतु दुसऱ्या बाजूने विकेट पडत गेल्याने भारतीय टीम अडचणीत सापडली. त्यानंतर जडेजा आणि हार्दिक पांड्याने उत्तम बॅटिंग करत भारताचा डाव सावरला. जडेजाने 50 बॉलमध्ये नाबाद 66 रन्स केल्या तर पांड्याने 76 बॉलमध्ये नाबाद 92 रन्स केल्या. या दोघांच्या 150 रनच्या पार्टनरशिपमुळे भारतीय टीमला 300 रन्सचा पल्ला गाठता आला. यामध्ये भारताच्या शेवटच्या 100 रन्स केवळ 51बॉलमध्ये आल्या. चाहते या दोघांच्या बॅटिंगचा आनंद घेत असताना कॉमेंट्री बॉक्समधून संजय मांजरेकर जडेजाच्या बॅटिंगचे कौतुक करताना दिसून येत होते. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष गेले. त्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी पूर्वी घडलेला ‘बिट्स अँड पीसेस’ प्रसंगाची आठवण काढत संजय मांजरेकर याच्यावर विविध मिम्स व्हायरल केले. या वर्षाच्या सुरुवातीस, मांजरेकर(sanjay manjrekar) यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तसेच आयपीएलमधील बीसीसीआयच्या कॉमेंट्री पॅनेलमधून वगळण्यात आले होते. नंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट मालिकेत त्यांना कॉमेंट्री करण्यासाठी निवडण्यात आले आहे. 2019 च्या वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान ऑल राउंडर रवींद्र जडेजाला “बिट्स अँड पिसेस क्रिकेटर” म्हणून मांजरेकर यांनी वाद निर्माण केला होता. 50 ओव्हरच्या क्रिकेटमध्ये जडेजा कारकिर्दीच्या ज्या टप्प्यावर आहे त्या ‘बिट्स अँड पिसेस’ प्लेयर्सचा म्हणजे धड कामगिरी न करता तुकड्यातुकड्यांत खेळणाऱ्याचा मी फारसा चाहता नाही. त्याऐवजी मला त्याच्यातील बॅट्समन आणि स्पिनर आवडला असता असे मांजरेकर म्हटले होते. मांजरेकरांच्या या ट्विटवर जडेजाने प्रत्युत्तर दिलं होतं, ‘तरीदेखील मी तुमच्यापेक्षा दुप्पट मॅच खेळल्या असून अजूनही खेळत आहे. कारकिर्दीत गोष्टी साध्य केलेल्या व्यक्तींचा आदर करणे शिका. याआधी देखील मी तुमच्या वर्बल डायरियाविषयी खूप ऐकले आहे’ असं ट्वीट केले होते. दरम्यान, त्यानंतरच्या सामन्यात जडेजाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीनंतर मांजरेकरने त्याच्या कामगिरीचे कौतुक केले होते. जडेजाने आपल्या अफाट प्रतिभेच्या बळावर हे साध्य केले असल्याचे त्यावेळी ते म्हणाला होते. त्यानंतर ट्विटरवर आज पुन्हा एकदा जडेजा आणि मांजेरकर यांच्यातील ती घटना वर काढत अनेकांनी मांजरेकरांवर निशाणा साधला.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    पुढील बातम्या