इमरान खान कसला आदर्श? भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूंनी काढली खरडपट्टी

इमरान खान कसला आदर्श? भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूंनी काढली खरडपट्टी

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावरून भारताला अणुयुद्धाची धमकी दिली होती. यावरून भारतीय क्रिकेटपटूंनी टीका केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 ऑक्टोबर : पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना भारताच्या क्रिकेटपटूंनी फैलावर घेतलं आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, इरफान पठाण, हरभजन सिंग, माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन यांनी ट्विट्वरून इमरान खान यांना सुनावलं आहे. या सर्वांनी इमरान खान द्वेष पसरवत असल्याचं म्हटलं आहे. इमरान खान यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत केलेल्या भाषणात भारताला अणुयुद्धाची धमकी दिली होती.

मोहम्मद शमीने ट्वीट करताना म्हटलं की, महात्मा गांधीनी त्यांचे आयुष्य प्रेम, सद्भाव आणि शांती निर्माण करण्यासाठी वाहून घेतलं होतं. तर इमरान खानने मात्र, संयुक्त राष्ट्र संघाच्या व्यासपीठावरून धमकी देण्यात धन्यता मानली. पाकिस्तानला अशा नेत्याची गरज आहे जो विकास, नोकरी आणि आर्थिक स्थिती सुधारेल. युद्धाच्या गोष्टी आणि दहशतवाद्यांना आसरा देणाऱ्यांची देशाला गरज नाही असंही शमीने म्हटलं आहे.

हरभजन सिंग आणि इरफान पठाणने सुद्धा इमरान खानला धारेवर धरलं आहे. संयुक्त राष्ट्रसंघात भाषणातून भारताला अणुयुद्धाची धमकी दिली. एका खेळाडू म्हणून इमरान खानने दोन्ही देशांमध्ये फक्त द्वेषच निर्माण केला. एक खेळाडू म्हणून मला त्यांच्याकडून शांततेसाठी प्रयत्नांची आशा असल्याचे ते म्हणाले.

भारताचे माजी कर्णधार अझरुद्दीन यांनीही इमरान खान यांना त्यांच्या भाषणावरून घेरले आहे. संयुक्त राष्ट्रसंघात इमरान खान यांनी काय भाषण केलं माहिती नाही. पण कोणत्याही खेळाडूकडून अशी अपेक्षा नव्हती. मला वाटलं होतं तुम्ही बदल घडवून आणाल आणि पाकिस्तान दहशतवाद्यांच्या विळख्यातून मुक्त होईल.

यापूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर यानेही जोरदार टीका केली होती.

गंभीर म्हणाला होता की, एका खेळाडूला आदर्श मानलं जातं. चांगला व्यवहार, नैतिकता आणि चारित्र्याचा आदर्श ठेवला जातो. नुकतंच आम्ही एका माजी खेळाडूला बोलताना पाहिलं तेसुद्धा दहशतवाद्यांचा आदर्श म्हणून.

VIDEO: वरळी मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध होणार? उद्धव ठाकरे म्हणतात...

Published by: Suraj Yadav
First published: October 3, 2019, 2:12 PM IST
Tags: imran khan

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading