मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

India Vs England: टीम इंडियाच्या बैठकीत शेतकरी आंदोलनावर चर्चा; खेळाडूंनी सोशल मीडियावर मांडलं मत

India Vs England: टीम इंडियाच्या बैठकीत शेतकरी आंदोलनावर चर्चा; खेळाडूंनी सोशल मीडियावर मांडलं मत

virat kohli

virat kohli

India vs England : गुरुवारी सोशल मीडियावर शेतकरी आंदोलनाचीच चर्चा पाहायला मिळाली. टीम इंडियाच्या खेळाडूंनी देखील ट्विटरवर जाऊन याबद्दल आपली मते मांडली आहेत.

  • Published by:  news18 desk

नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी: भारत विरुद्ध इंग्लंड हा पहिला कसोटी सामना उद्यापासून (शुक्रवार) सुरू होणार आहे. त्यानिमित्त आज टीम इंडियाची बैठक पार पडली. मात्र ह्या बैठकीमध्ये रणनीती सोबतच देशातली एकूण परिस्थिती लक्षात घेता शेतकरी आंदोलनावर सुद्धा चर्चा झाल्याचं कर्णधार विराट कोहलीने सांगितलं आहे. आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना हिच्या एका ट्वीट नंतर बऱ्याच बॉलिवूड स्टार आणि क्रिकेटपटूंनी एकामागे एक ट्वीट करत सरकारला आपला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच बाहेरील लोकांनी भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये असं देखील सुनावलं आहे.

जाणून घेऊया नक्की कोण काय म्हणालं :

#IndiaTogether आणि  #IndiaAgainstPropoganda हे दोन हॅशटॅग वापरत सचिन तेंडुलकरने एक ट्वीट केलं आहे. सचिन लिहितो,‘ भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही. बाह्य शक्ती या प्रेक्षक असू शकतात परंतु सहभागी होऊ शकत नाहीत. भारतीयांना भारत चांगलाच माहीत आहे आणि त्यांनीच भारतासाठी निर्णय घ्यावा. चला एक राष्ट्र म्हणून एकजूट राहूया.’

त्याच्या ह्या ट्वीट वर 55 हजाराहून अधिक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत.

विराट कोहलीने देखील #IndiaTogether हॅशटॅग वापरत आपलं मत मांडलं आहे. त्याने लिहिलंय की,’ मतभेदांच्या या काळात आपण सर्वजण एकजूट राहूया. शेतकरी हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे आणि मला खात्री आहे की सर्व पक्षांमधील शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि एकत्रितपणे जाण्यासाठी एक मैत्रीपूर्ण तोडगा निघेल.’

तर ‘ जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारत तिच्या अंतर्गत बाबींकडे मैत्रीपूर्ण तोडगा काढण्यास समर्थ आहे.’ असं अनिल कुंबळे यांनी ट्वीट करत लिहिलं आहे.

भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने मात्र ‘यॉर्कर’ टाकला आहे. इरफान पठाण म्हणतो की, ‘ जेव्हा अमेरिकेत जॉर्ज फ्लोयडची एका पोलिस कर्मचाऱ्याने निर्घृणपणे हत्या केली होती, तेव्हा आमच्या देशाने आपले दुःख व्यक्त केले होते.”

अजिंक्य रहाणे म्हणाला की, ‘ आपण एकत्र उभे राहिलो तर  निराकरण होणार नाही असा कुठलाही प्रश्न नाही. चला तर मग आपण एकजूट राहू आणि आपल्या अंतर्गत समस्येचे निराकरण करण्याच्या दिशेने काम करूया.’

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले की, ‘भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेती हा एक महत्त्वाचा भाग आहे. शेतकरी हा कोणत्याही देशाच्या परिसंस्थेचा आधार असतो. ही एक अंतर्गत बाब आहे जी मला खात्री आहे की संवादातून सोडविली जाईल. जय हिंद!’

First published:

Tags: Ajinkya rahane, Farmer protest, Ravi shastri, Sachin tendulakar, Social media, Team india, Twitter, Virat kohli