मुंबई, 7 जानेवारी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला 9 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना हा नागपूरच्या विदर्भ क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार असून याकरता भारतीय संघ नागपुरात दाखल झाला आहे. मात्र कसोटी सामन्यासाठी सराव करत असताना विराट कोहलीचा नवा कोरा फोन हरवल्याची बातमी समोर येत आहे.
विराट कोहलीने मंगळवारी ट्विट करून एक दुःखद बातमी शेअर केली. त्याने ट्विट करत लिहिले, "तुमचा नवीन फोन अनबॉक्स केल्याशिवाय हरवला यापेक्षा मोठं दुःख नाही. कोणी तो पाहिला आहे का?". विराटच्या या ट्विटवर चाहते विविध प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. काही चाहत्यांना हे ट्विट जाहिरातीचा भाग असल्याचे वाटते. सध्या विराटाचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याच्यावर अनेक मिम्स बनत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, India vs Australia, Nagpur, Virat kohli