मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'मला 2 आई असल्याचा गर्व होता पण...', कोरोनाने आई-बहीण हिरावल्यानंतर क्रिकेटर वेदा कृष्णमूर्तीची भावुक पोस्ट

'मला 2 आई असल्याचा गर्व होता पण...', कोरोनाने आई-बहीण हिरावल्यानंतर क्रिकेटर वेदा कृष्णमूर्तीची भावुक पोस्ट

महिली क्रिकेटर वेदा कृष्णमूर्तीने कोरोनात आपली आई आणि बहिणी ला गमावलं आहे.

महिली क्रिकेटर वेदा कृष्णमूर्तीने कोरोनात आपली आई आणि बहिणी ला गमावलं आहे.

भारताची महिला क्रिकेटर वेदा कृष्णमूर्तीने (Cricketer Veda Krishnamurthy) 2 आठवड्यांतच आपली आई आणि बहिणीला कोरोनामुळे गमावलं आहे.

  • Published by:  News18 Desk

दिल्ली, 10 मे : भारतात कोरोनाचा कहर काही थांबत नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Second Wave of the Corona) संक्रमण वाढतंच आहे. कोरोनाने सर्वसामान्य लोकांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांना गाठलं आहे. कित्येक सेलिब्रिटींनीही आपल्या जवळचे नातेवाईक गमावले आहेत. अशाच सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे भारताची महिली क्रिकेटर वेदा कृष्णमूर्ती (Cricketer Veda Krishnamurthy). कोरोनामुळे आधी तिने आपली आई गमावली आणि आता बहीण.

वेदा कृष्णमूर्तीला दुहेरी शोक झाला आहे. कोरोनाच्या लाटेत तिने आपली आई (Mother) आणि बहिणीला (Sister) गमावलं आहे. 2 आठवड्यांआधीच तिच्या आईचं निधन झालं होतं. त्य़ानंतर आता तिच्या बहिणीचाही कोरोनाने मृत्यू झाला आहे. वेदाने सोशल मीडियावर (social media) यासंदर्भात भावुक पोस्ट (Post) लिहिली आहे.

"दोन आठवड्यांच्या आतच आम्ही आमच्या परिवारातल्या दोन व्यक्तींना गमावलं आहे. माझी आई आणि बहिण यांना मी गमावलं आहे. आई मला कधीही वाटलं नव्हतं की, मला तुझ्याशिवाय जगावं लागेल. तू मला खूप स्ट्राँग बनवलं. पण गेल्या काही दिवसात मी पूर्णपणे खचले आहे. आई तू आपल्या घराचा आधार स्तंभ होती. आई तू मला आयुष्याकडे प्रॅक्टिकली (Practically) पाहायला शिकवलं आहे. तू सगळ्यात सुंदर, हसमुख आणि नि:स्वार्थ होतीस".

('चाव्या तयार, मग उशीर कशाला?'शरद पवारांच्या भेटीनंतर आव्हाडांनी शेअर केला किस्सा)

"बहिणीसाठीही तिने भावना व्यक्त केल्या आहेत. "दीदी तू माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा भाग होतीस. तू फायटर होतीस, मलाही तू लढायला शिकवलं. तुम्ही दोघी माझ्या प्रत्येक गोष्टीत आनंद शोधत असायच्या. तुम्ही दोघी आयुष्यात असल्याचा मला गर्व होता. वाटायचं की माझ्याकडे दोन आई आहेत. तुमच्याबरोबर घालवलेले हे दिवस फारच सुंदर होते. पण वाटलं नव्हतं की हे शेवटचे दिवस असतील. तुमच्या जाण्याने आमचं पूर्ण आयुष्यच बदललं आहे. पुढे काय करेन माहित नाही. एवढंच सांगेन मी तुम्हा दोघींवर खूप प्रेम करते. तुमची खूप आठवण येईल"

(उत्तर प्रदेशात भाजपच्याच आमदाराला मिळेना बेड; पत्नीला 3 तास जमिनीवरच झोपवलं)

याच पोस्ट मध्ये वेदाने या कठीण काळात साथ देणाऱ्या सगळ्यांचे आभारही मानले आहेत. तर, कोरोनाच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी सुरक्षित रहा, मजबूत रहा आणि कोरोना काळात सगळे नियम पाळण्याचं आवाहनही तिने केलं आहे.

First published:

Tags: Coronavirus, Cricket